Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मिनी बँकांना संलग्नतेची अडचण र

मिनी बँकांना संलग्नतेची अडचण र

मिनी बँका उभारणीत जिल्ह्यात संलग्नतेची (कनेक्टिव्हिटी) अडचण येत आहे. यासाठी सातपुड्याच्या दुर्गम व अति दुर्गम भागातील १२ गावांचा सर्व्हे करून त्यांची निवड करण्यात आली

By admin | Updated: May 23, 2014 01:46 IST2014-05-23T01:46:23+5:302014-05-23T01:46:23+5:30

मिनी बँका उभारणीत जिल्ह्यात संलग्नतेची (कनेक्टिव्हिटी) अडचण येत आहे. यासाठी सातपुड्याच्या दुर्गम व अति दुर्गम भागातील १२ गावांचा सर्व्हे करून त्यांची निवड करण्यात आली

Problems with Affiliation of Mini Banks | मिनी बँकांना संलग्नतेची अडचण र

मिनी बँकांना संलग्नतेची अडचण र

वींद्र मोराणकर, नंदुरबार - अल्ट्रा स्मॉल बँक अर्थात मिनी बँका उभारणीत जिल्ह्यात संलग्नतेची (कनेक्टिव्हिटी) अडचण येत आहे. यासाठी सातपुड्याच्या दुर्गम व अति दुर्गम भागातील १२ गावांचा सर्व्हे करून त्यांची निवड करण्यात आली. परंतु कनेक्टिव्हिटीअभावी प्रशासनही हतबल झाले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात बँकांची निर्मिती करणे अवघड आहे. असे असले तरी जास्तीत जास्त नागरिकांना बँकांचे व्यवहार करता यावेत यासाठी बँका थेट ग्राहकाच्या दारात नेता याव्यात या अनुषंगाने अल्ट्रा स्मॉल बँक अर्थात मिनी बँक उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला. जिल्हाधिकारी व जिल्हा अग्रणी बँक यांच्या समन्वयातून या प्रयोगासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी गेल्या सहा महिन्यांपूर्वी सातपुड्यातील १२ गावांचा सर्व्हे करण्यात आला. त्यात अक्कलकुवा तालुक्यातील अंकुशविहीर, मोरांबा, होराफळी, डाब, वडफळी, पिंपळखुटा, काठी, करंजळा, जमाना तसेच धडगाव तालुक्यातील चुलवड, धनाजे व तोरणमाळ या गावांचा समावेश आहे. काही ठिकाणी परिसरात वीजपुरवठा असला तरी भारत दूरसंचार निगमची कनेक्टीव्हीटी नाही. याशिवाय सी.एस.पी.ला १५० चौरस फूट शासकीय जागेची आवश्यकता आहे.

Web Title: Problems with Affiliation of Mini Banks