Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्राजक्ता कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा ९५ टक्के निकाल ४३ पैकी ४१ विद्यार्थिनींची परीक्षेत बाजी

प्राजक्ता कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा ९५ टक्के निकाल ४३ पैकी ४१ विद्यार्थिनींची परीक्षेत बाजी

अकोला : सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनींचे भविष्य घडविणारे महाविद्यालय म्हणून प्राजक्ता विद्यालय व क न्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. बारावीच्या निकालात प्राजक्ता महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बाजी मारली असून, महाविद्यालयाचा ९५ टक्के निकाल लागल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

By admin | Updated: June 2, 2014 23:43 IST2014-06-02T23:43:55+5:302014-06-02T23:43:55+5:30

अकोला : सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनींचे भविष्य घडविणारे महाविद्यालय म्हणून प्राजक्ता विद्यालय व क न्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. बारावीच्या निकालात प्राजक्ता महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बाजी मारली असून, महाविद्यालयाचा ९५ टक्के निकाल लागल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Prajakta Kanya College resulted in 95 percent of the 41 students out of 41 students | प्राजक्ता कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा ९५ टक्के निकाल ४३ पैकी ४१ विद्यार्थिनींची परीक्षेत बाजी

प्राजक्ता कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा ९५ टक्के निकाल ४३ पैकी ४१ विद्यार्थिनींची परीक्षेत बाजी

ोला : सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनींचे भविष्य घडविणारे महाविद्यालय म्हणून प्राजक्ता विद्यालय व क न्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. बारावीच्या निकालात प्राजक्ता महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बाजी मारली असून, महाविद्यालयाचा ९५ टक्के निकाल लागल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
कौलखेड परिसरातील प्राजक्ता कला महाविद्यालयाचा निकाल अनेकांच्या अपेक्षा उंचावणारा आहे. नियमित उन्हाळी वर्ग व विविध प्रकाशनाच्या प्रश्नपत्रिकेचा सराव व अभ्यासाकरिता पोषक वातावरणामुळे विद्यार्थिनींमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातदेखील विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचे नाव राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या रामेश्वरी विनायकराव मुलनकर हिने कला शाखेतून सर्वाधिक ८१.५३ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर शेतामध्ये मोलमजुरी करणारी चांदूर येथील दुर्गा उगवेकर हिला ७३ टक्के मिळाले आहेत. याप्रमाणेच शुभांगी डहाणे व हर्षा सदांशिव यांना प्रत्येकी ७८.४६ टक्के गुण प्राप्त झाले. क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर कबड्डीमध्ये महाविद्यालयाला लौकि क मिळवून देणार्‍या रजनी तायडे व वैष्णवी घोगरे यांना प्रत्येकी ५०४ गुण मिळाले आहेत.

कोट..
विद्यार्थिनींच्या यशामध्ये महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारीवृंद यांचा मोठा वाटा आहे. शिक्षकांचे मनापासून सहकार्य असल्यामुळे प्रगतीचा आलेख चढता आहे. महाविद्यालयाच्या सचिव व सेवानिवृत्त प्राचार्या नलिनी देशमुख यांच्यासह प्रा.संजय गोळे, प्रा.ज्योती देशमुख, प्रा.विठ्ठल पवार, प्रा.वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींचे भविष्य उज्ज्वल होत आहे. यशाचे श्रेय निश्चितच शिक्षकांना जाते.
-सागर देशमुख, प्राचार्य

Web Title: Prajakta Kanya College resulted in 95 percent of the 41 students out of 41 students