Lokmat Money > बिझनेस न्यूज > पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?

पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?

PM Awas Yojana: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रक्रिया समजून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:35 IST2025-05-20T15:34:17+5:302025-05-20T15:35:59+5:30

PM Awas Yojana: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रक्रिया समजून घ्या.

pradhan mantri awas yojna deadline has been extended now you can apply till 30th december | पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?

पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?

PM Awas Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री आवास योजने'साठी (PMAY) अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. या घोषणेमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील लाखो आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण त्यांना आता परवडणाऱ्या दरात कायमस्वरूपी घर मिळवण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे.

मुदत कधीपर्यंत वाढवली?
जर तुम्ही अजूनही कोणत्याही कारणास्तव प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केला नसेल, तर आता तुमच्याकडे ३० डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत आहे! सरकारने शहरी (PMAY-U) आणि ग्रामीण (PMAY-G) दोन्ही योजनांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, या योजनेअंतर्गत आतापर्यंत ९२.६१ लाखांहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. PMAY-U अंतर्गत, कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी सरकारकडून २.५ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कोण पात्र आहे?

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा.
  • त्याच्या नावावर देशात कुठेही स्वतःचे पक्के घर नसावे.
  • ग्रामीण भागासाठी: कुटुंबाचे मासिक उत्पन्न १०,००० रुपयांपेक्षा कमी असावे. लाभार्थींची निवड सामाजिक-आर्थिक जात जनगणना (SECC-2011) च्या आधारे केली जाईल.

शहरी भागासाठी:

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपर्यंत असावे.
  • कमी उत्पन्न गटासाठी (LIG) वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत असावे.
  • मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) वार्षिक उत्पन्न ९ लाख रुपयांपर्यंत असावे.
  • या योजनेत EWS आणि LIG गटातील महिला, विशेषतः विधवा महिला, तसेच अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC) आणि अल्पसंख्याक समुदायातील महिलांना प्राधान्य दिले जाते.
  • रिक्षाचालक, रस्त्यावरील विक्रेते, रोजंदारीवर काम करणारे कामगार, औद्योगिक कामगार आणि स्थलांतरित कामगार यांचाही या योजनेत समावेश होऊ शकतो.

अर्ज कसा करायचा?

  • सर्वात आधी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर (PMAY च्या पोर्टलवर) जा.
  • होमपेजवरील 'Citizen Assessment' या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या परिस्थितीनुसार ड्रॉपडाउन मेनूमधून योग्य पर्याय निवडा (उदा. तुम्ही झोपडपट्टीत राहणारे असाल किंवा इतर कोणत्या गटात येत असाल).
  • आता एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला तुमचे नाव आणि आधार कार्ड क्रमांक भरावा लागेल.
  • 'चेक' बटणावर क्लिक करून तुमचा आधार पडताळणी करा.
  • त्यानंतर नोंदणी फॉर्ममधील सर्व आवश्यक माहिती (जसे की पत्ता, कुटुंबाची माहिती इ.) काळजीपूर्वक भरा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • कॅप्चा कोड भरा आणि 'सबमिट' बटणावर क्लिक करा.

वाचा - गुंतवणूकदारांसाठी 'डिव्हिडंड'चा डबल धमाका! BEL, DLF सह 'या' कंपन्या देणार छप्परफाड लाभांश

कोणती कागदपत्रे लागतील?

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक खात्याचा तपशील (पासबुकची प्रत)
  • रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड यासारखे कोणतेही ओळखपत्र

Web Title: pradhan mantri awas yojna deadline has been extended now you can apply till 30th december

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.