Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स

Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स

Post Office Investment Scheme: प्रत्येक व्यक्ती आपल्या कमाईतील काही हिस्सा अशा ठिकाणी गुंतवू इच्छिते जिथे पैसा सुरक्षित राहील आणि त्यावर चांगला परतावा मिळेल. विशेषतः निवृत्तीनंतर पैशांची कमतरता भासू नये आणि नियमित उत्पन्नाची सोय व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश असतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 14:16 IST2025-12-17T14:14:45+5:302025-12-17T14:16:08+5:30

Post Office Investment Scheme: प्रत्येक व्यक्ती आपल्या कमाईतील काही हिस्सा अशा ठिकाणी गुंतवू इच्छिते जिथे पैसा सुरक्षित राहील आणि त्यावर चांगला परतावा मिळेल. विशेषतः निवृत्तीनंतर पैशांची कमतरता भासू नये आणि नियमित उत्पन्नाची सोय व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश असतो

Post Office senior citizen saving scheme You will earn Rs 20000 every month sitting at home what is the scheme, see details | Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स

Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स

Post Office Investment Scheme: प्रत्येक व्यक्ती आपल्या कमाईतील काही हिस्सा अशा ठिकाणी गुंतवू इच्छिते जिथे पैसा सुरक्षित राहील आणि त्यावर चांगला परतावा मिळेल. विशेषतः निवृत्तीनंतर पैशांची कमतरता भासू नये आणि नियमित उत्पन्नाची सोय व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश असतो. या दृष्टीनं पोस्ट ऑफिसच्या बचत योजना अत्यंत लोकप्रिय आहेत. यामध्ये 'पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना' (SCSS) विशेष लक्षवेधी ठरत असून, ती अनेक बँकांच्या एफडीपेक्षा जास्त व्याज देत आहे.

गुंतवणुकीवर सरकारची सुरक्षा हमी

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केलेल्या गुंतवणुकीला स्वतः सरकार सुरक्षिततेची हमी देते. पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेविंग्स स्कीममध्ये मोठ्या बँकांच्या एफडीच्या तुलनेत अधिक व्याजदर मिळतो. या योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिक दरमहा २०,००० रुपयांपर्यंतचे नियमित उत्पन्न मिळवू शकता. या सरकारी योजनेत केवळ १००० रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करता येते.

सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी

८.२% दरानं मिळतंय जोरदार व्याज

या योजनेअंतर्गत सरकार १ जानेवारी २०२४ पासून गुंतवणूकदारांना ८.२ टक्के दरानं आकर्षक व्याज देत आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित उत्पन्नासोबतच या योजनेत कर सवलतीचा लाभही मिळतो. या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा ३० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते. ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती स्वतःच्या नावावर किंवा जोडीदारासोबत संयुक्त खातं उघडू शकते.

काही विशेष प्रकरणांमध्ये वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. 'व्हीआरएस' (VRS) घेणाऱ्या व्यक्तीचं वय ५५ ते ६० वर्षांच्या दरम्यान असू शकते, तर संरक्षण दलातून निवृत्त झालेले कर्मचारी ५० ते ६० वर्षांच्या दरम्यान गुंतवणूक करू शकतात. मात्र, यासाठी काही अटी लागू आहेत.

दरमहा २०,००० रुपये कमाईचं गणित

या योजनेत ३० लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास ८.२ टक्के व्याजदराप्रमाणे गुंतवणूकदाराला वार्षिक २.४६ लाख रुपये व्याज मिळते. ही व्याजाची रक्कम महिन्याला विभागली तर ती साधारणपणे महिन्याला २०,००० रुपये होते. दरवर्षी एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला व्याजाची रक्कम दिली जाते. जर मुदत पूर्ण होण्यापूर्वी खातेदाराचा मृत्यू झाला, तर खातं बंद केलं जातं आणि सर्व रक्कम कागदपत्रांमध्ये नोंदवलेल्या वारसाला सोपवली जाते.

Web Title : पोस्ट ऑफिस स्कीम: वरिष्ठ नागरिक बचत से ₹20,000 मासिक कमाएं।

Web Summary : पोस्ट ऑफिस वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) उच्च ब्याज दर, वर्तमान में 8.2%, और ₹30 लाख तक का अधिकतम निवेश प्रदान करती है। यह नियमित मासिक आय और सरकारी सुरक्षा प्रदान करती है, जो सेवानिवृत्त लोगों के लिए वित्तीय स्थिरता चाहने वालों के लिए आदर्श है। 60 वर्ष और उससे अधिक आयु के व्यक्ति निवेश कर सकते हैं।

Web Title : Post Office Scheme: Earn ₹20,000 Monthly with Senior Citizen Savings.

Web Summary : The Post Office Senior Citizen Savings Scheme (SCSS) offers high interest rates, currently 8.2%, with a maximum investment of ₹30 lakhs. It provides regular monthly income and government security, making it ideal for retirees seeking financial stability. Individuals aged 60 and above can invest.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.