Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पोस्टल बँकेला परवाना मिळण्याची शक्यता

पोस्टल बँकेला परवाना मिळण्याची शक्यता

र्थमंत्रालयाने विरोध दर्शविला असला तरी भारतीय पोस्टल बँकेला मर्यादित स्वरूपाचा परवाना मिळू शकतो, असे भारतीय रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सूचित केले आहे.

By admin | Updated: May 24, 2014 04:24 IST2014-05-24T04:24:16+5:302014-05-24T04:24:16+5:30

र्थमंत्रालयाने विरोध दर्शविला असला तरी भारतीय पोस्टल बँकेला मर्यादित स्वरूपाचा परवाना मिळू शकतो, असे भारतीय रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सूचित केले आहे.

The possibility of getting a license for the postal ball | पोस्टल बँकेला परवाना मिळण्याची शक्यता

पोस्टल बँकेला परवाना मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली : अर्थमंत्रालयाने विरोध दर्शविला असला तरी भारतीय पोस्टल बँकेला मर्यादित स्वरूपाचा परवाना मिळू शकतो, असे भारतीय रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सूचित केले आहे. कॉम्पिटिशन कमिशन आॅफ इंडियाच्या वार्षिक समारंभानिमित्त आयोजित व्याख्यानात राजन बोलत होते. बॅँकिंग परवान्यासाठी पोस्ट विभागाने अर्ज केला असून त्यांना मर्यादित प्रमाणात बँकिंग व्यवसाय करण्याचा परवाना दिला जाण्याची शक्यता राजन यांनी व्यक्त केली. या बॅँकेला ठेवी स्वीकारणे तसेच रक्कम हस्तांतरित करण्याची परवानगी मिळू शकते; मात्र संपूर्ण रक्कम शासकीय रोख्यांमध्ये गुंतविण्याचे बंधन त्यांना पाळावे लागेल, असे राजन यांनी सांगितले. पोस्ट विभागाने नवीन बॅँक स्थापन करण्यासाठी उभारावयाच्या भांडवलाला अर्थमंत्रालयाने विरोध केला आहे. त्यामुळे या बॅँकेला परवाना मिळणार की नाही, याबाबत संशयाचे वातावरण होते. रिझर्व्ह बॅँकेने पत्रक काढून नवीन बॅँकांना मर्यादित स्वरूपात व्यवहारांसाठी परवाने दिले जाऊ शकतात असे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर राजन यांच्या या सूचक विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The possibility of getting a license for the postal ball