Lokmat Money > बिझनेस न्यूज > जगातील सर्वात मोठे कॉर्पोरेट ऑफिस हब तयार! PM मोदी करणार उद्घाटन, पेंटागॉन पेक्षाही जबरदस्त 'सूरत डायमंड बोर्स'

जगातील सर्वात मोठे कॉर्पोरेट ऑफिस हब तयार! PM मोदी करणार उद्घाटन, पेंटागॉन पेक्षाही जबरदस्त 'सूरत डायमंड बोर्स'

डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी इंटरकनेक्टेड इमारत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 10:17 AM2023-12-16T10:17:56+5:302023-12-16T10:18:48+5:30

डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी इंटरकनेक्टेड इमारत आहे.

PM Modi To Inaugurate Surat Diamond Bourse - World`s Largest Corporate Office Hub in Surat On Sunday 16, 2023 | जगातील सर्वात मोठे कॉर्पोरेट ऑफिस हब तयार! PM मोदी करणार उद्घाटन, पेंटागॉन पेक्षाही जबरदस्त 'सूरत डायमंड बोर्स'

जगातील सर्वात मोठे कॉर्पोरेट ऑफिस हब तयार! PM मोदी करणार उद्घाटन, पेंटागॉन पेक्षाही जबरदस्त 'सूरत डायमंड बोर्स'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच रविवारी जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस हब 'सूरत डायमंड बोर्स' चे उद्घाटन करणार आहेत. 3400 कोटी रुपये खर्च करून 35.54 एकर जमिनीवर बांधलेले सूरत डायमंड बोर्स (SDB) खडबडीत आणि पॉलिश्ड हिऱ्यांच्या व्यापारासाठी जागतिक केंद्र बनणार आहे.

डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी इंटरकनेक्टेड इमारत आहे. कारण, या इमारतीमध्ये 4,500 हून अधिक इंटरकनेक्टेड कार्यालये आहेत. कार्यालयाची इमारत पेंटागॉनपेक्षा मोठी आहे आणि देशातील सर्वात मोठे कस्टम क्लिअरन्स हाऊस आहे. या इमारतीत 175 देशांतील 4,200 व्यापारी सामावून घेण्याची क्षमता आहे, जे पॉलिश्ड हिरे खरेदी करण्यासाठी सुरतमध्ये येतील. या व्यापार सुविधेमुळे अंदाजे 1.5 लाख लोकांना रोजगार मिळेल. तसेच, जगाच्या कानाकोपऱ्यातील हिरे खरेदीदारांना सुरतमध्ये व्यवसाय करण्यासाठी जागतिक व्यासपीठ मिळेल.

सूरत डायमंड बोर्सचे माध्यम समन्वयक दिनेश नावडिया यांनी एका निवेदनात सांगितले की, उद्घाटनापूर्वीच मुंबईतील अनेक हिरे व्यापाऱ्यांनी आपल्या कार्यालयांचा ताबा घेतला आहे. या व्यापारांना लिलावानंतर व्यवस्थापनाने हे वाटप केले होते. तसेच, सूरत डायमंड बोर्सच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी याठिकाणी आयोजित सभेला संबोधित करतील, असेही दिनेश नावडिया यांनी सांगितले.

दरम्यान, याआधी जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वरील म्हटले होते की, सुरत डायमंड बोर्सने आता पेंटागॉनला मागे टाकून गेल्या 80 वर्षांपासून जगातील सर्वात मोठी कार्यालय इमारत बनवली आहे. तसेच, सुरत डायमंड बोर्स सूरतच्या हिरे उद्योगाची गतिशीलता आणि वाढ दर्शवते. हा देखील भारताच्या उद्योजकतेचा पुरावा आहे. हे व्यापार, नावीन्य आणि सहकार्याचे केंद्र म्हणून काम करेल. याशिवाय आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण करेल, असेही म्हटले होते.

Web Title: PM Modi To Inaugurate Surat Diamond Bourse - World`s Largest Corporate Office Hub in Surat On Sunday 16, 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.