PM Kisan : देशातील कोट्यवधी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती, तो 'पीएम किसान सन्मान निधी'चा २२ वा हप्ता १३ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र, ई-केवायसी आणि शेतकरी ओळखपत्र अपडेट असूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप २ हजार रुपये जमा झालेले नाहीत. जर तुम्हीही अशाच शेतकऱ्यांपैकी एक असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
हप्ता न मिळण्याची 'ही' असू शकतात प्रमुख कारणे
- पात्र असूनही पैसे न मिळण्यामागे काही तांत्रिक किंवा वैयक्तिक बदल कारणीभूत असू शकतात.
- बँक खात्यातील त्रुटी : बँक खात्याची माहिती चुकीची असणे किंवा बँक खात्याचे ई-केवायसी पूर्ण नसणे.
- भू-पडताळणी : जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी करताना काही त्रुटी राहिल्या असल्यास हप्ता रोखला जाऊ शकतो.
- उत्पन्न मर्यादेत बदल : जर लाभार्थी शेतकरी आता प्राप्तिकर भरत असेल किंवा त्याला खासगी/सरकारी नोकरी लागली असेल, तर तो या योजनेतून बाद होतो.
- पेन्शन : जर लाभार्थ्याला इतर कोणत्याही सरकारी योजनेतून १० हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल, तर त्याला पीएम किसानचा लाभ मिळत नाही.
तक्रार कुठे आणि कशी करावी?
- जर तुम्ही वरील सर्व अटी पूर्ण करत असाल आणि तरीही हप्ता मिळाला नसेल, तर तुम्ही केंद्र सरकारच्या हेल्पलाइनवर संपर्क साधू शकता.
- हेल्पलाइन नंबर : १५५२६१ किंवा ०११-२४३००६०६ या क्रमांकावर कॉल करा.
- ईमेल आयडी : तुमच्या तक्रारीसाठी `pmkisan-ict@gov.in` या अधिकृत ईमेलवर सविस्तर माहिती पाठवा.
वाचा - युद्धामुळे शेजारी राष्ट्र होरपळले! पेट्रोल ३१ तर डिझेल ५४ रुपयांनी महागले; LPG २००० रुपये पार
तुमचे स्टेटस असे तपासा: सोप्या स्टेप्स
- तुमच्या हप्त्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी खालील प्रक्रियेचा अवलंब करा.
- सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर pmkisan.gov.in जा.
- Login पर्यायावर क्लिक करून तुमची माहिती आणि कॅप्चा कोड भरा.
- 'Farmer Corner' मध्ये गेल्यावर 'Beneficiary Status' या पर्यायावर क्लिक करा.
- आपले राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडा.
- शेवटी तुमच्या स्क्रीनवर तुमच्या हप्त्याचे स्टेटस दिसेल, ज्यावरून पैसे कधीपर्यंत जमा होतील याची माहिती मिळेल.
