Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती

पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती

Petrol-Diesel Price : जागतिक स्तरावर, कच्च्या तेलाच्या किमतींनी १०० डॉलर्स प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 10:20 IST2026-04-05T10:09:04+5:302026-04-05T10:20:09+5:30

Petrol-Diesel Price : जागतिक स्तरावर, कच्च्या तेलाच्या किमतींनी १०० डॉलर्स प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे.

Petrol-Diesel Price Today: Shell India Hikes Diesel by ₹25, Petrol by ₹7.41 | पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती

पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती

Petrol-Diesel Price : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीने १०० डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडल्यामुळे इंधन दरवाढीचे संकट गहिरे झाले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देत किमती स्थिर ठेवल्या असल्या, तरी खाजगी क्षेत्रातील तेल कंपन्यांनी मात्र दरवाढीचा सपाटा लावला आहे. 'नायरा एनर्जी' पाठोपाठ आता 'शेल इंडिया' ने १ एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे.

खाजगी कंपन्यांकडून 'बंपर' दरवाढ
जागतिक स्तरावर वाढलेल्या किमतींमुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी खाजगी कंपन्यांनी दरात मोठी वाढ केली आहे.
शेल इंडिया : पेट्रोलच्या दरात ७.४१ रुपये तर डिझेलच्या दरात तब्बल २५ रुपयांची विक्रमी वाढ केली आहे.
नवीन दर : खाजगी आउटलेट्सवर आता पेट्रोल सुमारे ११९ रुपये आणि डिझेल १२३ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे.

आजचे प्रमुख शहरांतील इंधन दर (प्रति लीटर)
सरकारी कंपन्यांचे (IOC, BPCL, HPCL) दर खालीलप्रमाणे स्थिर आहेत.

शहर पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये) 
मुंबई १०३.५४ ९०.०३ 
दिल्ली ९४.७७ ८७.६७ 
बेंगळुरू १०२.९२ ९०.९९ 
चेन्नई १००.८० ९२.३९ 
पुणे (अंदाजित) १०४.०५ ९०.६० 

वाचा - पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा

प्रीमियम इंधनही महागले!

  • केवळ सामान्य इंधनच नाही, तर प्रीमियम इंधनाच्या किमतींनीही गगन भरारी घेतली आहे.
  • XP100 (इंडियन ऑईल): १ एप्रिल रोजी या प्रीमियम पेट्रोलच्या दरात ११ रुपयांची वाढ झाली. यामुळे किंमत १४९ रुपयांवरून थेट १६० रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे.
  • एक्स्ट्रा ग्रीन (डिझेल): प्रीमियम डिझेलच्या किमतीतही वाढ झाली असून, तो दर ९१.४९ रुपयांवरून ९२.९९ रुपये झाला आहे.
     

Web Title : पेट्रोल 7.41 रुपये, डीजल 25 रुपये महंगा: निजी कंपनियों ने बढ़ाई कीमतें।

Web Summary : शेल इंडिया जैसी निजी तेल कंपनियों ने ईंधन की कीमतों में भारी वृद्धि की। पेट्रोल 7.41 रुपये और डीजल 25 रुपये प्रति लीटर महंगा हुआ। अब शेल का पेट्रोल 119 रुपये और डीजल 123 रुपये का है। प्रीमियम ईंधन भी महंगा हुआ, XP100 की कीमत 160 रुपये तक पहुंची।

Web Title : Petrol up ₹7.41, diesel soars ₹25: Private firms hike prices.

Web Summary : Private oil firms like Shell India sharply increased fuel prices. Petrol rose by ₹7.41 and diesel by a staggering ₹25 per liter. Shell's petrol now costs ₹119 and diesel ₹123. Premium fuels also saw hikes, with XP100 reaching ₹160.