Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक

पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक

Elitecon International Multibagger Stock: गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ६७०० टक्क्यांहून अधिक जबरदस्त वाढ झाली आहे. कंपनीनं आपल्या शेअर्सचं विभाजनही केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:51 IST2025-09-23T15:49:30+5:302025-09-23T15:51:13+5:30

Elitecon International Multibagger Stock: गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ६७०० टक्क्यांहून अधिक जबरदस्त वाढ झाली आहे. कंपनीनं आपल्या शेअर्सचं विभाजनही केलं आहे.

penny stock elitecon international become multibagger stock 1 lakh value now 68 lakh rupees | पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक

पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक

Elitecon International Multibagger Stock: पेनी स्टॉक एलिटकॉन इंटरनॅशनल (Elitecon International) एका वर्षातच मल्टीबॅगर बनला आहे. कंपनीचे शेअर्स एका वर्षात ₹३ वरून ₹२०० च्या पुढे गेलेत. मंगळवारी (२३ सप्टेंबर २०२५) BSE मध्ये एलिटकॉन इंटरनॅशनलचे शेअर्स ५ टक्क्यांच्या वाढीसह ₹२०४.८५ वर बंद झाले. पाच दिवसांत कंपनीचे शेअर्स २१ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. तर, गेल्या एका वर्षात एलिटकॉन इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये ६७०० टक्क्यांहून अधिक जबरदस्त वाढ झाली आहे. कंपनीनं आपल्या शेअर्सचं विभाजनही केलं आहे.

कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹४२२.६५ आहे. तर, ५२ आठवड्यांचा नीचांक ₹२.८२ आहे.२७ सप्टेंबर २०२४ रोजी एलिटकॉन इंटरनॅशनलचे शेअर्स ₹३ वर होते. २३ सप्टेंबर २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ₹२०४.८५ वर बंद झाले. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ६७२८ टक्क्यांची वाढ झाली आहे. जर एखाद्या व्यक्तीनं २७ सप्टेंबर २०२४ रोजी एलिटकॉन इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये ₹१ लाख गुंतवले असते आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज त्या ₹१ लाखांच्या शेअर्सची किंमत ₹६८.२८ लाख झाली असती.

आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली

या वर्षी आतापर्यंत १८७५% ची वाढ

या वर्षी आतापर्यंत एलिटकॉन इंटरनॅशनलच्या (Elitecon International) शेअर्समध्ये १८७५ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, १ जानेवारी २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ₹१०.३७ वर होते. २३ सप्टेंबर २०२५ रोजी ते ₹२०४.८५ वर बंद झाले. गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ५८४ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर गेल्या ३ महिन्यांत २६५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

शेअर्सचं १० तुकड्यांमध्ये विभाजन

एलिटकॉन इंटरनॅशनल (Elitecon International) ने आपल्या शेअर्सचे विभाजनही केले आहे. कंपनीने आपला शेअर १० तुकड्यांमध्ये विभागला आहे. जून २०२५ मध्ये कंपनीनं ₹१० फेस व्हॅल्यू असलेल्या आपल्या शेअर्सचे ₹१ दर्शनी मूल्य असलेल्या १० शेअर्समध्ये विभाजन केलं आहे.

(टीप- यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: penny stock elitecon international become multibagger stock 1 lakh value now 68 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.