lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ५ ₹ला भारतात मिळते Parle-G बिस्कीट; कंगाल पाकिस्तान अन् विकसित अमेरिकेत किती आहे किंमत?

५ ₹ला भारतात मिळते Parle-G बिस्कीट; कंगाल पाकिस्तान अन् विकसित अमेरिकेत किती आहे किंमत?

Parle-G Biscuit: Parle-Gचा प्रवास खडतर तसेच प्रेरणादायी आहे. जगभरात अनेक ठिकाणी हे बिस्कीट पोहोचल्याचे सांगितले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 07:49 PM2023-05-09T19:49:38+5:302023-05-09T19:50:20+5:30

Parle-G Biscuit: Parle-Gचा प्रवास खडतर तसेच प्रेरणादायी आहे. जगभरात अनेक ठिकाणी हे बिस्कीट पोहोचल्याचे सांगितले जाते.

parle g biscuit get in india only for 5 rupees do you know the price of parle g biscuit in america and pakistan | ५ ₹ला भारतात मिळते Parle-G बिस्कीट; कंगाल पाकिस्तान अन् विकसित अमेरिकेत किती आहे किंमत?

५ ₹ला भारतात मिळते Parle-G बिस्कीट; कंगाल पाकिस्तान अन् विकसित अमेरिकेत किती आहे किंमत?

Parle-G Biscuit: पार्ले जी बिस्किट माहिती नाही, अशी व्यक्ती क्वचितच भारतात सापडेल. देशाच्या कानाकोपऱ्यात पार्ले जी बिस्कीट पोहोचलेले आहे. पार्ले जीविषयी प्रत्येकाची एक आठवण आहे. गरीब असो की श्रीमंत हे बिस्किट चवीने खाल्ले जाते. प्रत्येक वर्गातील व्यक्ती या बिस्किटाची फॅन आहे. अनेकांची सकाळ Parle-G बिस्टिकाशिवाय पूर्ण होत नाही. मात्र, भारतात केवळ ५ रुपयांपासून मिळणारे पार्ले जी बिस्कीट परदेशातही अत्यंत लोकप्रिय आहे. 

Parle-Gची सुरुवात मुंबईतील विले पारले या भागातून झाला. एका बंद पडलेल्या फॅक्टरीतून हा लोकप्रिय ब्रँड तयार झाला. १९२९ मध्ये व्यापारी मोहनलाल दयाल यांनी ही बंद पडलेली फॅक्टरी खरेदी केली. त्यानंतर पार्ले नावाने ब्रँडची सुरुवात झाली. १९३८ मध्ये पार्ले-ग्‍लूको (Parle-Gloco) नावाने बिस्किटाचे उत्पादन सुरु करण्यात आले. मात्र, स्वातंत्र्यानंतर या बिस्किटाचे उत्पादन बंद झाले. बिस्किट तयार करण्यासाठी गव्हाचा वापर होत होता. गव्हाचे उत्पादनच कमी असल्याने आणि इतर देशातून गव्हाचा पुरवठा न झाल्यानं या बिस्किटाचे उत्पादन थांबविण्यात आले.

कंपनीने ग्लूको बिस्किटाचे नाव Pagle-G केले

पुन्हा या कंपनीने उत्पादन सुरु केले तेव्हा, बाजारात अनेक कंपन्यांनी तीव्र स्पर्धा केली. त्यावेळी ब्रिटानियाच्या ग्लूकोज-डी बिस्किटाने चांगला जम बसवला होता. त्यामुळे पार्ले कंपनीने ग्लूको बिस्किटाचे नाव ‘Pagle-G’ असे बदलून हे बिस्किट पुन्हा बाजारात आणले. सन १९८० नंतर पार्ले ग्लूको बिस्किटाचा आकार लहान करण्यात आला. सन २००० मध्ये कंपनीने ‘G’ अर्थ ‘Genius’ या टॅगलाईनचा वापर करत बिस्किटाला बाजारात रिलॉन्च केले.

विकसित अमेरिका अन् कंगाल पाकिस्तानात किती आहे किंमत?

भारतात पार्ले जीच्या ५ रुपयांच्या पॅकेटचे वजन ६५ ग्रॅम आहे. तर एका अहवालानुसार, अमेरिकेतील १ डॉलरच्या पार्ले जीचे ५६.५ ग्रॅमचे ८ पॅक येतात. या हिशोबाने विचार करता, हा पुडा जवळपास १०  रुपयांना मिळतो. शेजारील देशाचा विचार करता, भारतात ५ रुपयांत मिळणारा पार्लेजीचा पुडा आर्थिक संकटातून जाणाऱ्या पाकिस्तानमध्ये ५० रुपयांना विक्री होत आहे. पार्लेजीच्या ७९ ग्रॅमच्या पॅकची किंमत २० रुपये आहे. भारताच्या बाहेर हे बिस्किट जास्त किमतीला विक्री होते.

 

Web Title: parle g biscuit get in india only for 5 rupees do you know the price of parle g biscuit in america and pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.