India China Investment Deal: पाकिस्तान तणावानंतर आता भारतचीनवर चाप लावण्याच्या तयारीत आहे. भारतातचीनसोबत सुरू असलेल्या गुंतवणुकीच्या कराराला उशीर होत असल्याच्या बातम्या आता समोर येत आहेत. किंबहुना केंद्रातील मोदी सरकार आता चीन पुरस्कृत गुंतवणुकीच्या प्रस्तावांचा आढावा घेणार असून त्यामुळे संभाव्य मंजुरीला उशीर होऊ शकतो. एका मीडिया रिपोर्टनुसार, सरकार लवकरच होणाऱ्या किमान ६-७ चीन समर्थित गुंतवणूक करारांचा आढावा घेण्याची योजना आखत आहे. अशा परिस्थितीत या व्यवहारांना मंजुरी मिळण्यास उशीर होऊ शकतो.
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
एनडीटीव्ही प्रॉफिटच्या वृत्तानुसार, सरकार चीन समर्थित किमान सहा ते सात प्रमुख गुंतवणुकीच्या प्रस्तावांचा नवा, कठोर आढावा घेण्याची योजना आखत आहे. थेट परकीय गुंतवणुकीचे प्रस्ताव आणि चिनी कंपन्यांच्या पाठिंब्यानं सुरू असलेल्या संयुक्त उपक्रमांची चौकशी अधिक कठोर करण्याची सरकारची अपेक्षा आहे, असं सूत्रांच्या हवाल्यानं रिपोर्टमध्ये म्हटलंय. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यमान आणि भविष्यातील चीन समर्थित संयुक्त उपक्रमांना काटेकोर अनुपालन आवश्यकतांमधून जावं लागू शकतं.
भारतासोबत नुकत्याच झालेल्या लष्करी संघर्षादरम्यान चीननं पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर तणाव वाढला असताना हे पाऊल उचलण्यात आलं आहे. भारतानं यापूर्वी एप्रिल २०२० मध्ये चीनमधून होणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीवर निर्बंध लादले होते. ज्यामध्ये असंही म्हटलं होतं की अशा सर्व प्रस्तावांची तपासणी सरकारनं करावी आणि केस-टू-केस आधारावर फ्रेमवर्क अंतर्गत मंजूरी द्यावी.