Lokmat Money > बिझनेस न्यूज > PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा

PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा

PM Kisan Sanman Nidhi: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याची शेतकरी बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. आता त्यासाठी एक दिवस शिल्लक राहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 15:30 IST2025-08-01T15:29:09+5:302025-08-01T15:30:56+5:30

PM Kisan Sanman Nidhi: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याची शेतकरी बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. आता त्यासाठी एक दिवस शिल्लक राहिला आहे.

Only one day left for 20th installment of PM Kisan Yojana Check if your name is in the list of beneficiaries know procedure | PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा

PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा

PM Kisan Sanman Nidhi: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याची शेतकरी बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. आता त्यासाठी एक दिवस शिल्लक राहिला असून २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम येऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत सभा घेणार आहेत. यावेळी ते डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात २०००-२००० रुपये जमा करणार आहेत. तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल तर सर्वप्रथम तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे तपासून पाहा.

वार्षिक ६००० हजारांचा लाभ

या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. लाभाची रक्कम २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत १९ हप्ते देण्यात आले असून २० वा हप्ता २ ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे. २० व्या हप्त्यासाठी आधी जूनमध्ये, नंतर जुलैमध्ये देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं आणि आता सरकारनं अधिकृतपणे २ ऑगस्टची तारीख सांगितली आहे. पंतप्रधान मोदी सकाळी ११ वाजता वाराणसीतून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम जारी करतील.

असं तपासा आपलं नाव

जर तुम्हीही शेतकरी असाल आणि पीएम किसान योजनेच्या २० व्या हप्त्याचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर प्रथम तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते तपासा. यासाठी, खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
  • यानंतर Know Your Status या पर्यायावर जा.
  • आता नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर, तुम्हाला कॅप्चा कोड भरावा लागेल.
  • यानंतर Get OTP वर क्लिक करा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आलेला OTP टाकल्यानंतर, तुम्ही तुमची स्थिती पाहू शकाल.
  • लाभार्थीची स्थिती तपासण्यासोबतच, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य आहे.

Web Title: Only one day left for 20th installment of PM Kisan Yojana Check if your name is in the list of beneficiaries know procedure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.