Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > OnePlus जागतिक बाजारपेठेतून गाशा गुंडाळणार? भारतातील CEO रॉबिन लियू यांनीही दिला राजीनामा

OnePlus जागतिक बाजारपेठेतून गाशा गुंडाळणार? भारतातील CEO रॉबिन लियू यांनीही दिला राजीनामा

OnePlus CEO Resigns: वनप्लसबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. त्यातच कंपनीचे भारतातील सीईओ रॉबिन लियू यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 11:17 IST2026-03-26T11:16:00+5:302026-03-26T11:17:01+5:30

OnePlus CEO Resigns: वनप्लसबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. त्यातच कंपनीचे भारतातील सीईओ रॉबिन लियू यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.

OnePlus shutdown smartphone company indian market exit global market India CEO Robin Liu resigns | OnePlus जागतिक बाजारपेठेतून गाशा गुंडाळणार? भारतातील CEO रॉबिन लियू यांनीही दिला राजीनामा

OnePlus जागतिक बाजारपेठेतून गाशा गुंडाळणार? भारतातील CEO रॉबिन लियू यांनीही दिला राजीनामा

OnePlus CEO Resigns: वनप्लसबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, कंपनी जगातील अनेक प्रमुख बाजारपेठांमधील आपले कामकाज बंद करण्याच्या तयारीत आहे. ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा अलीकडेच वनप्लस इंडियाचे सीईओ रॉबिन लियू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय, ज्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळालंय.

युरोप, युके आणि अमेरिकेतील कामकाज बंद होण्याच्या शक्यता

प्रसिद्ध इंटरनेट टिपस्टर योगेश बरार यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील एका पोस्टमध्ये (जी आता डिलीट करण्यात आली आहे) असा दावा केला होता की, वनप्लस निवडक जागतिक बाजारपेठांमधील आपलं ऑपरेशन्स बंद करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे कामकाज एप्रिल २०२६ पासून बंद होऊ शकते. कंपनीनं आपल्या काही कर्मचाऱ्यांना याची माहिती दिल्याचे आणि अनेकांना सेव्हरन्स पॅकेज दिल्याचंही वृत्त आहे.

आज आंतरराष्ट्रीय बाजारात ४% ची तेजी, पाहा Comex वर किती आहे सोन्याचा भाव?

चीन आणि भारतावर लक्ष केंद्रित

या बदलाचा परिणाम चीनमधील व्यवसायावर होणार नाही. भारतीय बाजारपेठेत कंपनी आता मुख्यत्वे आपल्या बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोन्सवर लक्ष केंद्रित करणार आहे. टिपस्टरच्या मते, अमेरिका, युके आणि युरोपियन युनियनमधील (EU) ग्राहकांसाठी ही चांगली बातमी नाही.

भारत प्रमुख रॉबिन लियू यांचा राजीनामा

या अफवांच्या दरम्यान, मंगळवारी वनप्लस इंडियाचे सीईओ रॉबिन लियू यांनी राजीनामा दिला. कंपनीनं सांगितलं की, ते त्यांच्या "वैयक्तिक आवडीनिवडी जोपासण्यासाठी" कंपनी सोडत आहेत. लियू २०१८ मध्ये वनप्लसमध्ये आले होते आणि २०२४ मध्ये त्यांची भारत प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. ३१ मार्च हा त्यांचा शेवटचा कामाचा दिवस असून ते आधीच चीनला परतले आहेत. मात्र, भारतात कंपनीचे कामकाज स्थानिक धोरणानुसार सामान्यपणे सुरू राहील, असं वनप्लसनं स्पष्ट केलंय.

अनेक फ्लॅगशिप फोन्स रद्द होण्याची शक्यता

अलीकडेच कंपनीने भारतात OnePlus 15 (नोव्हेंबर २०२५), OnePlus 15R आणि OnePlus Pad Go 2 (डिसेंबर २०२५) लाँच केले होते. मात्र, आता अशा चर्चा आहेत की ओप्पोच्या या सब-ब्रँडनं आपला आगामी फोल्डेबल फोन OnePlus Open 2 आणि कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप OnePlus 15s चे लाँचिंग प्लॅन्स रद्द केले आहेत.

कमी होणारा मार्केट शेअर आणि विक्रीत घट

स्मार्टफोन बाजारातील तीव्र स्पर्धा आणि मेमरी चिपच्या कमतरतेमुळे वनप्लसच्या अडचणी वाढल्या आहेत. सायबरमीडिया रिसर्च नुसार, २०२५ मध्ये वनप्लसच्या शिपमेंटमध्ये ३२% घट नोंदवण्यात आली आहे. IDC च्या अंदाजानुसार, २०२५ मध्ये वार्षिक तत्त्वावर कंपनीची शिपमेंट ३८.८% पर्यंत घसरली आहे.

भारतात Nord 6 होणार लाँच

जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता असूनही, कंपनीनं घोषणा केली की ती पुढील महिन्यात भारतात आपली लोकप्रिय नॉर्ड सिरीजचा नवीन स्मार्टफोन OnePlus Nord 6 लाँच करणार आहे. भारतात मिड-रेंज बाजारपेठ कंपनीसाठी अजूनही महत्त्वाची असल्याचे हे संकेत आहेत.

Web Title : OnePlus वैश्विक बाज़ारों से बाहर? भारतीय CEO रॉबिन लियू का इस्तीफ़ा।

Web Summary : OnePlus सीईओ के इस्तीफे के बीच प्रमुख बाजारों से बाहर हो सकता है। चीन, भारत और बजट फोन पर ध्यान केंद्रित किया गया है। बाज़ार की चुनौतियों के कारण फ्लैगशिप फोन लॉन्च रद्द होने की संभावना है।

Web Title : OnePlus exits global markets? India CEO Robin Liu resigns.

Web Summary : OnePlus may exit key markets amid CEO resignation. Focusing on China, India, budget phones. Flagship phone launches likely cancelled due to market challenges.