Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > तेलटंचाईने जागतिक वणवा! जगभरात सुरू झाल्या उपाययोजना; अनेकांकडून ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य  

तेलटंचाईने जागतिक वणवा! जगभरात सुरू झाल्या उपाययोजना; अनेकांकडून ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य  

इराण आणि अमेरिका - इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे होर्मूझ सामुद्रधुनी ठप्प झाली असून, जहाजे अडकून पडली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 08:44 IST2026-03-11T08:43:11+5:302026-03-11T08:44:10+5:30

इराण आणि अमेरिका - इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे होर्मूझ सामुद्रधुनी ठप्प झाली असून, जहाजे अडकून पडली आहेत.

Oil shortage causes global panic! Measures have been taken worldwide; Many prefer 'work from home' | तेलटंचाईने जागतिक वणवा! जगभरात सुरू झाल्या उपाययोजना; अनेकांकडून ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य  

तेलटंचाईने जागतिक वणवा! जगभरात सुरू झाल्या उपाययोजना; अनेकांकडून ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य  

नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका - इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे होर्मूझ सामुद्रधुनी ठप्प झाली असून, जहाजे अडकून पडली आहेत. त्याचा थेट परिणाम जगभरातील अनेक देशांवर होण्यास सुरुवात झाली आहे. या वाढत्या तेल संकटामुळे भारतासह जगभरातील अनेक देशांनी खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. 

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अनेक कडक निर्बंधांची घोषणा केली; शिवाय पेट्रोल, डिझेलच्या दरात २० टक्क्यांनी वाढ केली आहे.

श्रीलंकेत पेट्रोल, डिझेलच्या किमतींत ८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर थायलंड, व्हिएतनाम या देशांनी इंधन संकटातून वाचण्यासाठी ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य दिले आहे. तर  बांगलादेश सरकारने देशातील सर्व सार्वजनिक व खासगी विद्यापीठे तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानचे मोठे निर्णय...

शिक्षण : सर्व शाळांना दाेन आठवड्यांची सुटी; उच्च शिक्षण संस्थांमध्ये केवळ ‘ऑनलाइन’ वर्ग चालणार.

प्रशासन : बँका आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी कार्यालये आठवड्यातून ४ दिवस उघडणार. 

वेतन : खासदारांच्या पगारात २५ टक्के, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात २ दिवसांची कपात करण्यात आली.

इंधनकपात : ८० टक्के सरकारी गाड्या पुढील दोन महिने बंद. मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर व डिनर-इफ्तार पार्ट्यांवर बंदी.

खर्चकपात : सरकारी कार्यालयांमध्ये एसी, फर्निचर आणि नवीन गाड्यांच्या खरेदीवर पूर्णपणे रोख.

पेट्रोल खरेदीसाठी उडाली झुंबड : पाकिस्तानात इंधनटंचाईची भीती निर्माण झाली असून, पेट्रोल खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपावर झालेल्या वादातून गोळीबार झाला. श्रीलंकेतही अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा दिसू लागल्या आहेत.

कोणत्या देशाने काय केले? 

फिलिपिन्स : ४ दिवसांचा कामाचा आठवडा I किमान १०% इंधन वापर कमी करण्याचे आदेश I एसीचे तापमान २४०C पेक्षा खाली ठेवू नये I  सार्वजनिक वाहतूक आणि शेतकऱ्यांना अनुदान

हंगेरी : पेट्रोल-डिझेलवर किंमत मर्यादा लागू I गरज पडल्यास राष्ट्रीय तेलसाठा वापरण्याचा निर्णय I दर वाढ न हाेण्यासाठी सरकारची पावले.

इजिप्त : इंधन दर १७% पर्यंत वाढवले. I वाढत्या खर्चाला तोंड देण्यासाठी आर्थिक उपाययोजना

तैवान : इंधनावरील काही कर कमी करण्याचा निर्णय तैवान सरकारने घेतला आहे.

म्यानमार : वाहनांना आलटून-पालटून रस्त्यावर उतरू देणार. यामुळे इंधनामध्ये बचत हाेईल.

ब्रिटन : अनावश्यक प्रवास टाळा, इंधन बचत करा, असा नागरिकांना सल्ला I इंधन विक्रेत्यांना दरवाढीवर नियंत्रण ठेवण्याचा इशारा. 

दक्षिण कोरिया : गेल्या ३० वर्षांत पहिल्यांदाच इंधन दरांवर मर्यादा लागू केली आहे. 

जपान : राखीव ठेवलेला कच्च्या तेलाचा साठा बाजारात आणण्याची तयारी सुरू.

श्रीलंकेत पेट्रोल २२ रुपयांनी महागले

श्रीलंका सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात ८ टक्के वाढ जाहीर केली आहे. नव्या दरांनुसार इंधनाच्या किमतींत प्रति लिटर २२  रुपयांची वाढ झाली आहे.

Web Title : वैश्विक तेल संकट: दुनिया भर में उपाय, 'वर्क फ्रॉम होम' को प्राथमिकता

Web Summary : संघर्ष के कारण वैश्विक तेल की कमी से दुनिया भर में कार्रवाई शुरू हो गई है। संकट को कम करने के लिए राष्ट्र वर्क-फ्रॉम-होम, ईंधन प्रतिबंध और मूल्य नियंत्रण जैसे उपाय लागू करते हैं।

Web Title : Global Oil Crisis Sparks Action: Work From Home Preferred Worldwide

Web Summary : Global oil shortage due to conflict triggers worldwide action. Nations implement measures like work-from-home, fuel restrictions, and price controls to mitigate the crisis' impact.