Lokmat Money > बिझनेस न्यूज > अरे, कुणी घर घेता का घर ! गेल्या वर्षभरात देशात घरांच्या विक्रीत ९ टक्क्यांची घट

अरे, कुणी घर घेता का घर ! गेल्या वर्षभरात देशात घरांच्या विक्रीत ९ टक्क्यांची घट

Home News: कोविडनंतर घरांच्या मागणीत झालेल्या वाढीला खीळ बसू लागली असून, देशातील प्रमुख नऊ शहरांमध्ये २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये घरांच्या विक्रीत तब्बल ९ टक्क्यांनी घट झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 09:34 IST2025-01-24T09:32:45+5:302025-01-24T09:34:09+5:30

Home News: कोविडनंतर घरांच्या मागणीत झालेल्या वाढीला खीळ बसू लागली असून, देशातील प्रमुख नऊ शहरांमध्ये २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये घरांच्या विक्रीत तब्बल ९ टक्क्यांनी घट झाली आहे.

Oh, does anyone buy a house? House sales in the country have fallen by 9 percent in the last year. | अरे, कुणी घर घेता का घर ! गेल्या वर्षभरात देशात घरांच्या विक्रीत ९ टक्क्यांची घट

अरे, कुणी घर घेता का घर ! गेल्या वर्षभरात देशात घरांच्या विक्रीत ९ टक्क्यांची घट

 मुंबई - कोविडनंतर घरांच्या मागणीत झालेल्या वाढीला खीळ बसू लागली असून, देशातील प्रमुख नऊ शहरांमध्ये २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये घरांच्या विक्रीत तब्बल ९ टक्क्यांनी घट झाली आहे. दुसरीकडे नवी मुंबईत मात्र घरांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हैदराबादमध्ये २०२४ मधील घरांच्या विक्रीत मोठी घसरण पाहायला मिळते. 

२०२३ मध्ये ५.२४ लाख घरांची विक्री झाली होती. ही संख्या २०२४ मध्ये ४.७ लाखांवर आली आहे. म्हणजे जवळपास ५० हजार घरे कमी विकली गेली आहेत. मागणी कमी असल्याने बांधकाम विकसकांनी नवीन प्रकल्प लाँच करण्याची गती कमी केली आहे. त्याचाही परिणाम घरांच्या विक्रीवर झाला आहे. बंगळुरू, चेन्नई आणि दिल्ली-एनसीआरमध्ये यावर्षी विक्रीपेक्षा जास्त नवीन घरे तयार झाली आहेत, असे प्रॉपइक्विटीचे समीर जासुजा म्हणाले.

मुंबई-पुण्यातील घरांची विक्री घटली
२०२३ च्या तुलनेत मुंबई आणि पुण्यातील घरांची मागणी कमी होऊ लागली आहे. वाढलेल्या किमतींमुळे या मोठ्या शहरांमध्ये घरे घेणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांना लागून असलेल्या उपनगरांमध्ये घर घेण्याकडे लोकांचा ओढा असल्याचे दिसते. नवी मुंबईतील विमानतळ लवकरच सुरू होणार असल्याने येथे घरखरेदी वाढली आहे.(स्रोत : प्रॉपइक्विटीचा अहवाल) 

एकूण घरांची विक्री
२०२३ - ५.१४ लाख 
२०२४ - ४.७ लाख

नवीन घरांची निर्मिती
२०२३ - ४.८१ लाख
२०२४ - ४.११ लाख

Web Title: Oh, does anyone buy a house? House sales in the country have fallen by 9 percent in the last year.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.