lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेलिगेअर प्रकरणात नवा ट्विस्ट, शेअर विक्रीच्या तपासासाठी बर्मन फॅमिलीचं सेबीला पत्र

रेलिगेअर प्रकरणात नवा ट्विस्ट, शेअर विक्रीच्या तपासासाठी बर्मन फॅमिलीचं सेबीला पत्र

रेलिगेअर प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. वाचा नक्की काय घडलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:31 PM2023-11-10T12:31:57+5:302023-11-10T12:32:30+5:30

रेलिगेअर प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. वाचा नक्की काय घडलं.

New twist in Religare case Burman family s letter to SEBI to investigate share sale know details | रेलिगेअर प्रकरणात नवा ट्विस्ट, शेअर विक्रीच्या तपासासाठी बर्मन फॅमिलीचं सेबीला पत्र

रेलिगेअर प्रकरणात नवा ट्विस्ट, शेअर विक्रीच्या तपासासाठी बर्मन फॅमिलीचं सेबीला पत्र

रेलिगेअर प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. डाबरचे प्रमोटर बर्मन कुटुंबानं (Burman family) बाजार नियामक सेबीला पत्र लिहिले आहे. प्रवर्तकांनी लिहिलेल्या या पत्रात रेलिगेअर एंटरप्रायझेसच्या (Religare Enterprises) चेअरपर्सन रश्मी सलुजा यांच्या शेअर्सच्या विक्रीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बर्मन कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या चार युनिट्सनी ९ नोव्हेंबर रोजी मार्केट रेग्युलेटर सेबीला पाठवलेल्या ईमेलमध्ये, रश्मी सलुजा (Rashmi Saluja) यांनी कुटुंबाच्या प्रतिनिधीला भेटल्यानंतर लगेचच त्यांच्या स्टेकचा काही भाग विकला असल्याचं म्हटलंय.

काय आहे प्रकरण?
ईटीच्या रिपोर्टनुसार, बर्मन कुटुंबाचे एमबी फिनमार्ट, पुरन असोसिएट्स, व्हिआयसी एन्टरप्रायझेस आणि मिल्की इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग यांची मिळून रेलिगेअरमध्ये २१.२४ टक्के भागीदारी आहे. रिपोर्टनुसार, जेव्हा बर्मन कुटुंबाच्या प्रतिनिधीनं रश्मी सलुजा यांच्याशी विवाह केला, तेव्हा कुटुंब लवकरच ओपन ऑफरद्वारे कंपनीतील बहुसंख्य भागभांडवल खरेदी करण्याचा विचार करत आहे. या भेटीनंतर सलुजा यांनी आपल्या स्टेकचा काही भाग विकल्याचा दावा करण्यात आला आहे.

बर्मन कुटुंबीयांच्यावतीनं सांगण्यात आलं की, त्यांचे प्रतिनिधी अर्जुन लांबा यांच्यासोबत बर्मन कुटुंबीयांसोबत बैठक झाली होती. या बैठकीनंतर सलुजा यांनी २१ ते २२ सप्टेंबर दरम्यान १.२९ लाख शेअर्स ३४.७१ कोटी रुपयांना विकले. त्याचवेळी या संपूर्ण प्रकरणावर रेलिगेअरच्या प्रवक्त्यानं सलुजा यांनी विकलेल्या शेअर्सचा या बैठकीशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं.

बर्मन कुटुंबावर गंभीर आरोप
रेलिगेअरच्या स्वतंत्र संचालकांनी बर्मन कुटुंबाविरुद्ध सेबी, आरबीआय, विमा नियामक यांच्याकडून चौकशीची मागणी केली असतानाच हे पत्र समोर आलं आहे. स्वतंत्र संचालकांनी बर्मन कुटुंबावर फसवणुकीसह गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी रेलिगेअरचे संस्थापक मलविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांच्याशी संगनमताचा आरोप केला आहे. हे दोन्ही संस्थापक सध्या पैशाच्या गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात आहेत.

Web Title: New twist in Religare case Burman family s letter to SEBI to investigate share sale know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.