Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातील प्रत्येक ग्राहकाला मिळतात 'हे' 6 अधिकार; 99% लोकांना माहिती नाही...

देशातील प्रत्येक ग्राहकाला मिळतात 'हे' 6 अधिकार; 99% लोकांना माहिती नाही...

National Consumer Rights Day: ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत प्रत्येक नागरिकाला मिळालेले अधिकार जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 20:15 IST2025-12-23T20:07:08+5:302025-12-23T20:15:29+5:30

National Consumer Rights Day: ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत प्रत्येक नागरिकाला मिळालेले अधिकार जाणून घ्या...

National Consumer Rights Day: Every consumer in the country gets 'these' 6 rights; 99% of people are not aware of them | देशातील प्रत्येक ग्राहकाला मिळतात 'हे' 6 अधिकार; 99% लोकांना माहिती नाही...

देशातील प्रत्येक ग्राहकाला मिळतात 'हे' 6 अधिकार; 99% लोकांना माहिती नाही...

National Consumer Rights Day: उद्या (24 डिसेंबर) देशभरात राष्ट्रीय ग्राहक दिन (National Consumer Day) साजरा केला जात आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश नागरिकांना त्यांच्या ग्राहक हक्कांबाबत जागरुक करणे हा आहे. बहुतांश लोक खरेदी करतात, पण त्यांच्याकडे कायदेशीर ताकदही आहे, याची माहिती अनेकांना नसते. याच अज्ञानाचा गैरफायदा अनेकदा कंपन्या आणि विक्रेते घेतात.

ही फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण कायदा 2019 (Consumer Protection Act 2019) लागू केला आहे. या कायद्यानुसार प्रत्येक ग्राहकाला 6 मूलभूत आणि मजबूत हक्क दिले गेले आहेत. मात्र, आजही सुमारे 99 टक्के नागरिकांना या हक्कांची पुरेशी माहिती नाही, ही बाब चिंताजनक आहे.

1) सुरक्षिततेचा हक्क

सुरक्षिततेचा हक्क ग्राहकाला अशा वस्तू आणि सेवांपासून संरक्षण देतो, ज्या त्याच्या जीविताला किंवा मालमत्तेला धोका पोहोचवू शकतात. कोणतीही कंपनी ग्राहकांसाठी घातक ठरणारी वस्तू बाजारात विकू शकत नाही. एखाद्या उत्पादनामुळे दुखापत, आजार किंवा जीवाला धोका निर्माण झाल्यास ग्राहक भरपाईची मागणी करू शकतो. हा हक्क विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स, अन्नपदार्थ आणि औषधांमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे.

2) माहितीचा हक्क

या हक्काअंतर्गत ग्राहकाला कोणत्याही उत्पादन किंवा सेवेबाबत पूर्ण, स्पष्ट आणि अचूक माहिती मिळण्याचा अधिकार आहे. यात गुणवत्ता, प्रमाण, शुद्धता, किंमत आणि वापराच्या अटी यांचा समावेश होतो. चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देऊन विक्री करणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. ग्राहकाने सुज्ञ निर्णय घ्यावा आणि फसवणूक टळावी, हाच या हक्काचा उद्देश आहे.

3) जबरदस्तीच्या खरेदीविरोधातील हक्क

कोणताही दुकानदार किंवा कंपनी ग्राहकावर जबरदस्तीने वस्तू किंवा सेवा लादू शकत नाही. ग्राहकाला पर्यायांची तुलना करण्याचा आणि नको असल्यास खरेदी न करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अनेक वेळा बंडल ऑफर, अनावश्यक सेवा किंवा अतिरिक्त शुल्क लादले जाते. अशा परिस्थितीत ग्राहक या हक्काचा वापर करू शकतो.

4) ऐकून घेण्याचा हक्क

खरेदीदरम्यान शोषण झाले किंवा सेवेत त्रुटी आढळल्यास ग्राहकाला आपली तक्रार मांडण्याचा हक्क आहे. ग्राहक मंच किंवा ग्राहक आयोगात जाऊन तो कंपनीला जबाबदार धरू शकतो. हा हक्क सुनिश्चित करतो की ग्राहकाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होणार नाही.

5) तक्रार निवारणाचा हक्क

या हक्काअंतर्गत ग्राहकाला त्याच्या तक्रारीचे न्याय्य आणि वेळेत निराकरण होईल, याची खात्री दिली जाते. दोषपूर्ण उत्पादन किंवा फसवणूक झाल्यास ग्राहक भरपाईची मागणी करू शकतो. ग्राहक न्यायालय दोषी आढळलेल्या कंपनीवर एक लाख रुपयांपर्यंत दंड आणि सहा महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षाही सुनावू शकते. त्यामुळे हा हक्क अत्यंत प्रभावी मानला जातो.

6) ग्राहक शिक्षणाचा हक्क

ग्राहक शिक्षणाचा हक्क नागरिकांना जागरूक आणि सक्षम ग्राहक बनवतो. ग्राहकांना त्यांचे हक्क, कायदे आणि तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया समजावी, हा यामागील उद्देश आहे.शिक्षित ग्राहकच भ्रामक जाहिराती आणि खोट्या दाव्यांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो, त्यामुळे बाजारपेठ अधिक पारदर्शक बनते.

राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व

भारतामध्ये पहिला ग्राहक संरक्षण कायदा 24 डिसेंबर 1986 रोजी अस्तित्वात आला. बदलत्या काळाच्या गरजेनुसार ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू करण्यात आला. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त या हक्कांची माहिती करून घेणे आणि त्यांचा वापर करणे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आहे.

Web Title : उपभोक्ता अधिकार: संरक्षण के लिए अपने 6 बुनियादी अधिकार जानें

Web Summary : राष्ट्रीय उपभोक्ता दिवस उपभोक्ता संरक्षण अधिनियम 2019 के तहत छह मौलिक उपभोक्ता अधिकारों पर प्रकाश डालता है। ये अधिकार सुरक्षा, जानकारी, विकल्प, सुनवाई, निवारण और शिक्षा सुनिश्चित करते हैं, जो उपभोक्ताओं को कंपनियों और विक्रेताओं द्वारा शोषण और अनुचित प्रथाओं से बचाते हैं। उपभोक्ता संरक्षण के लिए जागरूकता महत्वपूर्ण है।

Web Title : Consumer Rights: Know Your 6 Basic Rights for Protection

Web Summary : National Consumer Day highlights six fundamental consumer rights under the Consumer Protection Act 2019. These rights ensure safety, information, choice, a hearing, redressal, and education, empowering consumers against exploitation and unfair practices by companies and sellers. Awareness is crucial for consumer protection.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.