lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जबरदस्त! 'या' कंपनीचा शेअर वर्षभरात १४०० टक्क्यांनी वधारला, १ लाखाचे झाले १५ लाख; वाचा सविस्तर...

जबरदस्त! 'या' कंपनीचा शेअर वर्षभरात १४०० टक्क्यांनी वधारला, १ लाखाचे झाले १५ लाख; वाचा सविस्तर...

वित्तीय अस्थिरता आणि आर्थिक उतार-चढाव यामध्ये शेअर मार्केटनं गेल्या वर्षभरात विविध रंग गुंतवणुकदारांना दाखवले आहेत. शेअर बाजार सध्या गडगडला असला तरी चालू आणि गेल्या वित्त वर्षात अनेक कंपन्यांच्या शेअर्सचा बोलबाला देखील पाहायला मिळाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 03:06 PM2022-01-24T15:06:44+5:302022-01-24T15:07:44+5:30

वित्तीय अस्थिरता आणि आर्थिक उतार-चढाव यामध्ये शेअर मार्केटनं गेल्या वर्षभरात विविध रंग गुंतवणुकदारांना दाखवले आहेत. शेअर बाजार सध्या गडगडला असला तरी चालू आणि गेल्या वित्त वर्षात अनेक कंपन्यांच्या शेअर्सचा बोलबाला देखील पाहायला मिळाला आहे.

Multibagger stock jindal photo share rise 1400 per cent in a year 1 lakh investment become 15 lakh | जबरदस्त! 'या' कंपनीचा शेअर वर्षभरात १४०० टक्क्यांनी वधारला, १ लाखाचे झाले १५ लाख; वाचा सविस्तर...

जबरदस्त! 'या' कंपनीचा शेअर वर्षभरात १४०० टक्क्यांनी वधारला, १ लाखाचे झाले १५ लाख; वाचा सविस्तर...

मुंबई-

वित्तीय अस्थिरता आणि आर्थिक उतार-चढाव यामध्ये शेअर मार्केटनं गेल्या वर्षभरात विविध रंग गुंतवणुकदारांना दाखवले आहेत. शेअर बाजार सध्या गडगडला असला तरी चालू आणि गेल्या वित्त वर्षात अनेक कंपन्यांच्या शेअर्सचा बोलबाला देखील पाहायला मिळाला आहे. हुशारीनं गुंतवणूक केलेल्यांना कोट्यवधींचा फायदा झाल्याचंही दिसून आलं आहे. यातील एक उत्तम परतावा देणारा एक स्टॉक ठरला आहे तो म्हणजे जिंदाल फोटो  (Jindal Photo) कंपनीचा. या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात तब्बल १४०० टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जिंदाल फोटो बीसी ही जिंदाल ग्रूपचीच सहभागी कंपनी आहे. २१ जानेवारी २०२१ रोजी या कंपनीच्या एका शेअरची किंमत २७.२० रुपये इतकी होती. आज बरोबर एका वर्षानंतर २१ जानेवारी २०२२ रोजी कंपनीचा एक शेअर ४०८ रुपयांवर पोहोचला होता. याच दरम्यान बीएसई सेन्सेक्स १९ टक्क्यांनी वधारला आहे. जिंदाल फोटो ही एक होल्डिंग कंपनी असून सिक्युरिटीज कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. 

याच मल्टीबॅग स्टॉकमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी २१ जानेवारी २०२१ रोजी २७.२० रुपये हिशोबानं १ लाख रुपये गुंतवले असतील त्यांच्या स्टॉकची किंमत आज १५ लाख रुपये इतकी झाली आहे. अर्थात हा अहवाल वाचून लगेच या कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवावं असं होत नाही. कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना खूप सावधगिरी बाळगावी लागते आणि हे काम कोणत्याही अर्थ सल्लागाविना करू नये, असा सल्ला गुंतवणूकदारांना देण्यात आला आहे. 

'फॉर्च्युन इंडिया'च्या अहवालानुसार बीएसईनं या शेअरला लाँग टर्म सव्हिलान्स स्टेजमध्ये ठेवलं आहे. त्यामुळे या शेअर्सची खरेदी-विक्री अधिक काळजीपूर्वक करायला हवी. 

जिंदाल फोटो शेअरचा रेकॉर्ड
जिंदाल फोटो शेअरचं मार्केट कॅपिटलायझेशन ४१८.५४ कोटी रुपये इतकं आहे. या मायक्रोकॅप स्टॉकनं शॉर्ट टर्म आणि लाँग टर्ममध्ये मोठा परतावा मिळवून दिला आहे. गेल्या ३ वर्षात या स्टॉकनं १२०० टक्के, ५ वर्षात ४०६ टक्के आणि गेल्या १० वर्षाच्या कालावधीत तब्बल १६४ टक्के परतावा दिला आहे. गेल्या ६ महिन्यांचा रेकॉर्ड पाहात तर या स्टॉकनं जवळपास ४५० टक्के नफा मिळवून दिला आहे. तर चालू महिन्यात ४१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या १२ सेशनमध्ये या कंपनीच्या स्टॉकनं सलग वाढ नोंदवली असून ही वाढ ५८ टक्के इतकी मिळाली आहे. 

(डिस्क्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

Web Title: Multibagger stock jindal photo share rise 1400 per cent in a year 1 lakh investment become 15 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.