Lokmat Money > बिझनेस न्यूज > ३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक

३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक

Multibagger Stock: फोर्स मोटर्सच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मंगळवारी बीएसईमध्ये स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स ६ टक्क्यांहून अधिक वाढून २०,००० रुपयांवर पोहोचले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:58 IST2025-09-16T15:58:41+5:302025-09-16T15:58:41+5:30

Multibagger Stock: फोर्स मोटर्सच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मंगळवारी बीएसईमध्ये स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स ६ टक्क्यांहून अधिक वाढून २०,००० रुपयांवर पोहोचले.

Multibagger Stock force motors 1 lakh became more than 15 lakhs in 3 years stock increased by 180 percent in 6 months stock on 20000 rs | ३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक

३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक

Multibagger Stock: फोर्स मोटर्सच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मंगळवारी बीएसईमध्ये स्मॉलकॅप कंपनी फोर्स मोटर्सचे शेअर्स ६ टक्क्यांहून अधिक वाढून २०,००० रुपयांवर पोहोचले. मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्सनी गेल्या ३ वर्षात शेअरहोल्डर्सना मोठा परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सनी फक्त ३ वर्षात १ लाख रुपयांची गुंतवणूक १५ लाख रुपयांपेक्षा जास्त केली आहे. फोर्स मोटर्सच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी २१,९९९.९५ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ६१२८.५५ रुपये आहे.

असं केलं गुंतवणूकदारांना मालामाल

२३ सप्टेंबर २०२२ रोजी मल्टीबॅगर कंपनी फोर्स मोटर्सचे शेअर्स १३१०.८० रुपयांवर होते. १६ सप्टेंबर २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स २०००० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या ३ वर्षात कंपनीच्या शेअर्सनी शेअरहोल्डर्सना १४०० टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय. जर एखाद्या व्यक्तीनं २३ सप्टेंबर २०२२ रोजी फोर्स मोटर्सच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर १ लाख रुपयांनी खरेदी केलेल्या शेअर्सचे सध्याचं मूल्य १५.०७ लाख रुपये झाले असते.

भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?

६ महिन्यांत १८०% पेक्षा अधिक तेजी

गेल्या सहा महिन्यांत फोर्स मोटर्सच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ६ महिन्यांत १८०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. १७ मार्च २०२५ रोजी फोर्स मोटर्सचे शेअर्स ७०७७.०५ रुपयांवर होते. १६ सप्टेंबर २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स २०००० रुपयांवर पोहोचले. गेल्या ३ महिन्यांत फोर्स मोटर्सच्या शेअर्समध्ये ४३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याच वेळी, या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जर आपण गेल्या पाच वर्षांबद्दल बोललो तर, फोर्स मोटर्सच्या शेअर्समध्ये १६०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Multibagger Stock force motors 1 lakh became more than 15 lakhs in 3 years stock increased by 180 percent in 6 months stock on 20000 rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.