Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुकेश अंबानी यांचा मीडिया उद्योगात प्रवेश

मुकेश अंबानी यांचा मीडिया उद्योगात प्रवेश

रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आता माध्यमक्षेत्रात प्रवेश केला आहे

By admin | Updated: May 30, 2014 03:48 IST2014-05-30T03:48:25+5:302014-05-30T03:48:25+5:30

रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आता माध्यमक्षेत्रात प्रवेश केला आहे

Mukesh Ambani's entry into media industry | मुकेश अंबानी यांचा मीडिया उद्योगात प्रवेश

मुकेश अंबानी यांचा मीडिया उद्योगात प्रवेश

मुंबई : राष्ट्रीय आणि आर्थिक विषयक बातम्यांमधील अग्रगण्य अशा नेटवर्क १८ व टीव्ही १८ समूहात तब्बल चार हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह मालकी प्राप्त हिस्सेदारीची खरेदी करत रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आता माध्यमक्षेत्रात प्रवेश केला आहे. रिलायन्स समूहाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, या व्यवहारास रिलायन्स समूहाच्या संचालक मंडळाने मान्यता दिली असून हा सर्व व्यवहार ‘इंन्डिपेन्डंट मीडिया ट्रस्ट’च्या माध्यमातून होणार आहे. या ट्रस्टचे संपूर्णपणे लाभार्थी रिलायन्स कंपनी आहे. यानुसार, नेटवर्क १८ मध्ये रिलायन्स ७८ टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी करणार असून नेटवर्क १८ ची उपकंपनी असलेल्या टीव्ही १८ मध्ये ९ टक्क्यांची खरेदी होणार आहे. याखेरीज कंपनीच्या बाजारातील समभागांची खुल्या पद्धतीने खरेदी करणार आहे. या व्यवहाराची सूचना मुंबई शेअर बाजारासही देण्यात आली आहे. नेटवर्क १८ समूहात रिलायन्सची हिस्सेदारी यापूर्वीपासून आहे. २०१२ मध्ये २०५३ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह नेटवर्क १८ समूहाने ई टीव्ही वृत्त वाहिनी समूहातील राष्ट्रीय व काही प्रादेशिक वाहिन्यांमध्ये १०० टक्के हिस्सेदारी प्राप्त केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Mukesh Ambani's entry into media industry