पुणे: पुण्यात सुरू असलेल्या एशिया इकॉनॉमिक डायलॉगमध्ये (AED) रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Mabani) यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत आणि हरित उर्जे(ग्रीन एनर्जी)बाबत अतिशय सकारात्मक विधान केले आहे. पुणे इंटरनेशनल सेंटर पॉलिसी रिसर्च थिंक टँक आणि परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेला आशिया इकॉनॉमिक डायलॉग 23 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यावेळी या शिखर परिषदेची थीम 'पँडेमिक पोस्ट वर्ल्ड इन रेझिलिएंट ग्लोबल ग्रोथ' अशी ठेवण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे एमडी आणि अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बुधवारी या शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले.
यावेळी मुकेश अंबानी यांनी हरित ऊर्जेतील(Green Energy) गुंतवणुकीसाठी भारत हा एक चांगला आणि आकर्षक पर्याय असल्याचे म्हटले. पुणे हे आयटी उद्योगाचे मोठे केंद्र बनले आहे. ग्रीन एनर्जीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. भारत सातत्याने प्रगती करत आहे, आपला देश परवडणाऱ्या किमतीत हरित ऊर्जेचे उत्पादन वाढवेल. भारत स्वच्छ आणि हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगात अग्रेसर होईल. रिलायन्स इंडस्ट्रीज भारतात हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी मदत करेल. जीवाश्म इंधनाच्या वापरापासून दूर जाऊन भारत हरित ऊर्जेला प्रोत्साहन देईल, असे ते म्हणाले.
ग्रीन एनर्जीत सरकारचे योगदान
ते पुढे म्हणाले की, भारत सरकार हरित ऊर्जेसाठी निधी देण्याबाबत गंभीर आहे. भारत जगातील अनेक देशांमध्ये स्वच्छ ऊर्जा निर्यात करू शकतो. 2030 मध्ये भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. गेल्या काही वर्षांत जीवाश्म इंधनाचा वापर वाढला आहे. अर्थसंकल्पात हरित ऊर्जेबाबतही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यावेळी स्वच्छ ऊर्जा हा पर्याय नसून गरज आहे. मी वन्यजीव आणि निसर्गाचा मोठा प्रेमी आहे. मी एवढेच म्हणेन की निसर्ग आणि प्राणी वाचवण्यासाठी आपण पावले उचलली पाहिजेत.
तीन दिवस चालणार समिट आहे
पुणे इंटरनॅशनल सेंटर पॉलिसी रिसर्च थिंक टँक आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एशिया इकॉनॉमिक डायलॉग 23 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे. या वेळी परिषदेची थीम पोस्ट-पँडेमिक वर्ल्ड इन रेझिलिएंट ग्लोबल ग्रोथ अशी ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गज साथीच्या आजारातून सावरलेल्या जगासमोरील आव्हानांवर चर्चा करत आहेत.
