Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोका-कोलाचा बाजार उठणार? मुकेश अंबानी यांच्या एका निर्णयाने पलटली बाजी

कोका-कोलाचा बाजार उठणार? मुकेश अंबानी यांच्या एका निर्णयाने पलटली बाजी

Mukesh Ambani Campa : मुकेश अंबानींच्या कॅम्पाने कोका कोला आणि पेप्सी सारख्या मोठ्या ब्रँडची धडधड वाढवली आहे. देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आता भारतीय ब्रँड टक्कर देणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:52 IST2025-01-16T14:51:22+5:302025-01-16T14:52:14+5:30

Mukesh Ambani Campa : मुकेश अंबानींच्या कॅम्पाने कोका कोला आणि पेप्सी सारख्या मोठ्या ब्रँडची धडधड वाढवली आहे. देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आता भारतीय ब्रँड टक्कर देणार आहे.

mukesh ambani campa to become international brand reliance drink to give more chills to cola business | कोका-कोलाचा बाजार उठणार? मुकेश अंबानी यांच्या एका निर्णयाने पलटली बाजी

कोका-कोलाचा बाजार उठणार? मुकेश अंबानी यांच्या एका निर्णयाने पलटली बाजी

Mukesh Ambani Campa : सॉफ्ट ड्रिंक म्हटलं की अजूनही डोळ्यांसमोर पेप्सी आणि कोका-कोला कंपनीचे ब्रँड्स येतात. मात्र, ७०च्या दशकात भारतीय शीतपेय ब्रँडचा बाजारात दबदबा होता. हे अनेकांना माहिती नाही. आता तोच ब्रँड पुन्हा नव्या रुपात बाजारात आला आहे. हा ब्रँड दुसरा तिसरा कोणी नसून उद्योगपती मुकेश अंबानी यांचा कॅम्पा कोला आहे. शीतपेय मार्केटमध्ये अंबानी यांनी एन्ट्री मारल्याने पेप्सी आणि कोका कोला कंपन्याचे धाबे दणाणले आहेत. कारण, रिलायन्स ग्रुप आपला ब्रँड आता भारताबाहेर प्रस्थापित करणार आहे.

काय आहे मुकेश अंबानींचा प्लॅन?
इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज कॅम्पा कोलाला मध्यपूर्वेत (मिडल इस्ट) घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे. काही महिन्यांपूर्वी इस्रायलने गाझावर हल्ला केल्याचे समर्थन अमेरिकने केले होते. या पार्श्वभूमीवर कोका-कोला आणि पेप्सीको ही अमेरिकन उत्पादनांनर बहिष्कार टाकण्याचे आवाहन नागरिकांना केलं जात आहे. अशा परिस्थितीत अंबानींच्या कॅम्पाकोलाला चांगली संधी निर्माण झाली आहे. भारतातून कॅम्पा कोलाची खेप आधीच बहरीनमधील किरकोळ स्टोअरमध्ये पोहोचली आहे. कंपनी टप्प्याटप्प्याने ओमान आणि सौदी अरेबियासारखे आणखी देश जोडणार आहे.

मुकेश अंबानींना कसा फायदा होईल?
मध्यपूर्वेतील स्थानिक ग्राहकांनी अमेरिकन उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यासाठी केलेल्या आवाहनाचा फायदा होईल. कारण इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा मिळत आहे, अशी रिलायन्सला आशा आहे. अलीकडील अहवाल सांगतात की कोका-कोला आणि पेप्सीकोच्या विक्रीवर अनेक आखाती देशांमध्ये परिणाम झाला आहे. कारण तेथील ग्राहक इतर देशांतील स्थानिक कोला किंवा ब्रँडकडे वळत आहेत.

रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी, जी समूहाच्या FMCG आणि किरकोळ व्यवसायांचे नेतृत्व करते. त्यांनी कंपनीच्या सर्वसाधारण बैकठीत याची माहिती दिली. समूहाने कॅम्पा "जागतिक स्तरावर नेण्याची योजना आखली आहे, ज्याची सुरुवात आशिया आणि आफ्रिकेपासून सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: mukesh ambani campa to become international brand reliance drink to give more chills to cola business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.