Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज

रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज

Top Stock Picks : या दिवाळी सणाला तुम्ही चांगल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी टॉप ५ शेअर्स घेऊन आलो आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 12:06 IST2025-10-14T11:27:49+5:302025-10-14T12:06:00+5:30

Top Stock Picks : या दिवाळी सणाला तुम्ही चांगल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी टॉप ५ शेअर्स घेऊन आलो आहोत.

Motilal Oswal Top Stock Picks Max Financial, BEL, and ACME Solar Among Top 5 Stocks to Buy Now | रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज

रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज

Top Stock Picks : देशातील सर्वात मोठा सण दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणासुदीला तुम्ही देखील चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. चालू तिमाहीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार चांगल्या स्टॉक्सच्या शोधात आहेत. या पार्श्वभूमीवर मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या रिसर्च डेस्कने ५ मोठ्या स्टॉक्सवर 'बाय' रेटिंग दिली आहे. यामध्ये रिन्यूएबल्स, डिफेन्स आणि फायनान्स सेक्टरमधील कंपन्यांचा समावेश आहे.

१. अकमी सोलार
टार्गेट प्राईज : ₹३७०
अकमी सोलरने प्रकल्प वितरणात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कंपनीने २०२५ पर्यंतची २.५ GW क्षमता वाढवून २०२८ पर्यंत ५.५ GW करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारी स्तरावर असलेले ४० GW PPA बॅकलॉग सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्यामुळे, अकमी मोठ्या प्रकल्पांसाठी सक्रियपणे बोली लावत आहे, ज्यामुळे कंपनीच्या कमाईची दृश्यमानता वाढेल. ही कंपनी पॉवर/रिन्यूएबल्स क्षेत्रात मोतीलाल ओसवाल यांची सर्वात 'टॉप पिक' आहे.

२. मॅक्स फायनान्शियल)
टार्गेट प्राईज (TP): ₹२,०००
दमदार बँकएश्युरन्स ट्रॅक्शन आणि लवचिक एजन्सी चॅनलमुळे मॅक्स फायनान्शियल इंडस्ट्रीच्या सरासरीपेक्षा जास्त गती राखण्याची शक्यता आहे. कंपनीच्या नवीन व्यवसायाच्या गतीमुळे 1QFY26 मध्ये VNB मार्जिन २०.१% पर्यंत वाढले, जे प्रतिस्पर्धकांमध्ये सर्वाधिक आहे. व्यवस्थापनाला FY26 मध्ये मार्जिन २४-२५% पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

३. भारत इलेक्ट्रॉनिक्स
टार्गेट प्राईज : ₹४९०
भारतीय लष्कराच्या DRDO-विकसित QRSAM 'अनंत शस्त्र' प्रकल्पासाठी ₹३०० अब्जची निविदा BEL ला मिळाली आहे, ज्यामुळे कंपनीचा ऑर्डर बुक ₹१ ट्रिलियनच्या पुढे गेला आहे. रडार्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम्स आणि ड्रोन-डिफेन्स सोल्यूशन्समध्ये मजबूत स्थान असल्यामुळे BEL ला आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सकडून सतत नवीन संधी मिळतील. संरक्षण आधुनिकीकरण होत असल्यामुळे दीर्घकालीन वाढीसाठी हा स्टॉक अत्यंत आकर्षक आहे.

४. देल्हिव्हरी
टार्गेट प्राईज : ₹५४०
इलेक्ट्रॉनिक्स पेमेंट्समध्ये वाढ आणि जीएसटी-आधारित उपभोग वाढीमुळे देल्हिव्हरीमध्ये सणासुदीच्या काळात मजबूत वाढ अपेक्षित आहे. ₹१४ अब्जमध्ये ईकॉम एक्सप्रेसचे अधिग्रहण केल्याने देल्हिव्हरीची ग्रामीण भागातील व्याप्ती आणि नेटवर्क क्षमता वाढेल, तसेच खर्चात कपात होईल. FY25-28 दरम्यान महसूल, EBITDA आणि PAT मध्ये अनुक्रमे १४%, ३८% आणि ५३% CAGR वाढ अपेक्षित आहे.

५. कमिन्स इंडिया
टार्गेट प्राईज : ₹४,५००
मॅन्युफॅक्चरिंग, रिअल इस्टेट, हेल्थकेअर आणि डेटा सेंटर्सकडून वाढत्या मागणीमुळे कंपनीच्या पॉवरजन सेगमेंटमध्ये वाढ होत आहे. रेल्वे, खाणकाम आणि बांधकाम क्षेत्रातील नवीन उत्पादनांमुळे औद्योगिक वाढीला मदत मिळेल, ज्यामुळे FY25-28 दरम्यान १८% CAGR अपेक्षित आहे. निर्यातीलाही जागतिक मागणीचा फायदा होत आहे.

वाचा - ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही

टीप : ही माहिती मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या संशोधन अहवालावर आधारित आहे. शेअर बाजारातीलगुंतवणूक बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

Web Title : नवीकरणीय, रक्षा, वित्त: ब्रोकरेज फर्म ने दिए इन 5 स्टॉक्स पर जबरदस्त रिटर्न का लक्ष्य

Web Summary : मोतीलाल ओसवाल ने अकमे सोलर, मैक्स फाइनेंशियल, भारत इलेक्ट्रॉनिक्स, देल्हीवेरी और कमिन्स इंडिया पर 'बाय' रेटिंग की सिफारिश की है। नवीकरणीय, रक्षा और वित्त क्षेत्रों के ये स्टॉक अच्छा रिटर्न देने की उम्मीद है। निवेश से पहले वित्तीय सलाहकार से सलाह लें।

Web Title : Renewables, Defense, Finance: 5 Stocks Promising High Returns, Brokerage Targets

Web Summary : Motilal Oswal recommends 'Buy' rating on Akme Solar, Max Financial, Bharat Electronics, Delhivery, and Cummins India. These stocks from renewables, defense and finance sectors are expected to give good returns. Target prices are also provided, but consult financial advisor before investing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.