Lokmat Money > बिझनेस न्यूज > मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?

मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?

Mahesh Babu Money Laundering Case: दक्षिण चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार महेश बाबू एका रिअल इस्टेट प्रकल्पाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकला आहे. या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना समन्स पाठवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 12:54 IST2025-04-22T12:53:09+5:302025-04-22T12:54:29+5:30

Mahesh Babu Money Laundering Case: दक्षिण चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार महेश बाबू एका रिअल इस्टेट प्रकल्पाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकला आहे. या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना समन्स पाठवले आहे.

money laundering how superstar mahesh babu invovle in real estate scam | मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?

मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?

Mahesh Babu Money Laundering Case: तेलुगू सुपरस्टार महेश बाबू यांना संक्तवसुली संचनालय अर्थात ईडीची नोटीस आल्याने चित्रपट सृष्टीत खळबळ उडाली आहे. साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुप या २ रिअल इस्टेट फर्म्सच्या फसवणुकीशी संबंधित हे प्रकरण आहे. ज्यांवर अनधिकृत भूखंड विकून, एकाच भूखंडाची अनेक पक्षांना पुनर्विक्री करून आणि बनावट नोंदणी हमी देऊन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, महेश बाबू यांच्यावर या २ विकासकांनी प्रमोट केलेल्या प्रकल्पांना पाठिंबा दिल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. पण, हे मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय आहे? यात महेश बाबू यांचा कसा संबंध चला सविस्तर समजून घेऊ.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याला त्याच्या जाहिरातीसाठी ५.९ कोटी रुपये मिळाले, त्यापैकी ३.४ कोटी रुपये चेकद्वारे आणि उर्वरित २.५ कोटी रुपये रोख स्वरूपात देण्यात आल्याचे वृत्त आहे. हा बेहिशेबी रोख व्यवहार आता ईडीच्या चौकशीच्या कक्षेत आला आहे.

मनी लाँड्रिंग म्हणजे काय?
मनी लाँडरिंग हा एक आर्थिक गुन्हा आहे. याचा अर्थ बेकायदेशीरपणे कमावलेले पैसे कायदेशीर म्हणून दाखवणे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, काळा पैसा पांढरा दाखवणे. यामध्ये, आरोपी व्यक्ती किंवा संघटना बेकायदेशीर मार्गांनी (भ्रष्टाचार, करचोरी, तस्करी, दहशतवादी निधी इ.) कमावलेला काळा पैसा पांढरा (कायदेशीर) दाखवण्याचा प्रयत्न करते.

वाचा - ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला

महेश बाबू यांच्यावर काय आरोप आहेत?
अहवालात म्हटले आहे की, "या गृहनिर्माण प्रकल्पांना महेश बाबूंनी दिलेल्या समर्थनाने गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यात आणि खरेदीदारांना आकर्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे मानले जाते." दुसरीकडे, तेलंगणा पोलिसांनी चौकशी सुरू असलेल्या विकासकांवर अनधिकृत आणि बेकायदेशीर मार्गांनी खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आर्थिक अनियमिततेप्रकरणी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वास्तविक, महेश बाबू कथित घोटाळ्याच्या ऑपरेशनशी संबंधित कोणत्याही प्रकरणात सहभागी असल्याचे दर्शविणारा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही.
 

Web Title: money laundering how superstar mahesh babu invovle in real estate scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.