lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची मोठी भेट, या राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर १५ रुपयांनी कमी

निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची मोठी भेट, या राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर १५ रुपयांनी कमी

पेट्रोल-डिझेल दर कपातीबाबत केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 03:45 PM2024-03-16T15:45:15+5:302024-03-16T15:48:48+5:30

पेट्रोल-डिझेल दर कपातीबाबत केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

Modi government's big gift before elections petrol and diesel prices reduced by Rs 15 in this state | निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची मोठी भेट, या राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर १५ रुपयांनी कमी

निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची मोठी भेट, या राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर १५ रुपयांनी कमी

पेट्रोल-डिझेल दर कपातीबाबत केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतातील लक्षद्वीप बेटावर, अँड्रोट आणि कल्पेनी बेटांसाठी पेट्रोल आणि डिझेलची किंमत प्रति लिटर १५.३ रुपये आणि कावरत्ती आणि मिनिकॉयसाठी ५.२ रुपये प्रति लिटरने कमी झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील ही कपात आजपासून लागू झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात कपात केल्यानंतर आता लक्षद्वीपच्या सर्व बेटांवर पेट्रोलचे दर १००.७५ रुपये/लिटर आणि डिझेलचे दर ९५.७१ रुपये/लिटर झाले आहेत. केंद्र सरकारने काल संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांनी कपात केली होती. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

तुम्ही पोस्टाचा विमा घेतला का? कमी प्रीमियम, बेनिफिट्सही अनेक, भरपूर स्कीम्सचा समावेश

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले नेते आहेत ज्यांनी #लक्षद्वीपच्या जनतेला आपले कुटुंब मानले आहे, असं पोस्टमध्ये म्हटले आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. मंत्रालयाने सांगितले की, लक्षद्वीपमध्ये, IOCL चार बेटांना कावरत्ती, मिनिकॉय, एंड्रोट आणि कालपेनी यांना पेट्रोल आणि डिझेल पुरवठा करते. आयओसीएलचे कावरत्ती आणि मिनिकॉय येथे डेपो आहेत. या डेपोंना केरळमधील कोची येथील IOCL डेपोतून पुरवठा केला जातो.

"लक्षद्वीप बेटे डेपोवरील भांडवली खर्चाची वसुली करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये ६.९० रुपये प्रति लिटरचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्याचा समावेश होता, मात्र आता वसुली पूर्ण झाल्यानंतर ती काढून टाकण्यात आली आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा आरएसपी अंदाजे ६.९० रुपयांनी कमी होईल, याचा ग्राहकांना फायदा होणार आहे. 

Web Title: Modi government's big gift before elections petrol and diesel prices reduced by Rs 15 in this state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.