रिअल इस्टेट बाजारपेठेत मिलेनियल्स व जनरेशन वाय हेच मुख्य खरेदीदार असल्याचं परत एकदा दिसून आलंय. वाढत्या ईएमआयच्या व घरांच्या किंमती स्थिर असूनही, खरेदीदारांचा आत्मविश्वास परत येत आहे. १ ते १.५ कोटी रुपये किंमत श्रेणीतील घरांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याची माहिती समोर आलीये.
मॅजिकब्रिक्सच्या ताज्या रिपोर्टनुसार या सेगमेंटनं दुसऱ्या तिमाहीत हाउसिंग सेंटिमेंट इंडेक्समध्ये सर्वोच्च गुण मिळवले आहेत. डेव्हलपर्स देखील या मागणीनुसार नवीन प्रकल्प लाँच करत असल्याचं यातून समोर येतंय.
FASTag वार्षिक पास २ महिन्यांतच ठरला 'सुपरहिट'; २५ लाख युजर्सचा आकडा पार, किती झालं ट्रान्झॅक्शन?
मिलेनियल्सकडून खरेदीचा आशावाद
घर खरेदीत मिलेनियल्स आणि जनरेशन वाय हेच मुख्य खरेदीदार ठरत आहेत. वार्षिक १०–३० लाख रुपये कमाई करणारे व्यावसायिकदेखील या बाजारात मजबूत आत्मविश्वास दाखवत आहेत. अनेकांना मालमत्तेच्या किंमती ६–१०% पर्यंत वाढतील अशी अपेक्षा असल्याने ते वेगाने निर्णय घेत असल्याचं या रिपोर्टमधून समोर आलंय.
शहरांच्या क्रमवारीत चेन्नई अव्वल
सर्वेक्षणानुसार शहरांच्या रँकिंगमध्ये बदल झाला आहे. चेन्नई हे सर्वात चांगले प्रदर्शन करणारे शहर म्हणून उदयास आलंय, त्यानंतर नोएडा/ग्रेटर नोएडा आणि कोलकाता यांचा क्रमांक लागतो. इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास, व्यावसायिक विकास आणि नवीन प्रकल्प सुरू झाल्यामुळे, परवडणाऱ्या आणि उच्च शक्यता असलेल्या बाजारपेठा पारंपारिक लक्झरी हब्सपेक्षा वेगानं पुढे जात आहेत. यामुळे, मेट्रोच्या आसपासचे क्षेत्र अधिक घर खरेदी करणाऱ्यांना आकर्षित करत आहेत.
₹१ ते १.५ कोटी दरम्यान किमतीच्या मिड-मार्केट हाउसिंग सेगमेंटची मागणी सर्वात वेगाने वाढली आहे. या सेगमेंटमध्ये १४९ एचएसआय नोंदवला गेला आहे. त्याच वेळी, ३९% खरेदीदार ₹२० ते ७५ लाख किमतीच्या घरांना, तर ३९% खरेदीदार ₹७५ लाख ते ₹१.५ कोटी किमतीच्या घरांना पसंत करतात. मिड-सेगमेंट आता मागणीचा सर्वात मोठा चालक झालाय.
रिअल इस्टेट वेल्थ क्रिएटर बनलंय
"हाऊसिंग सेंटीमेंटमधील ही सुधारणा भारताच्या रिअल इस्टेट मार्केटमधील लवचीकपणा दर्शवतं. किमती आणि व्याजदर स्थिर असल्याने, खरेदीदार रिअल इस्टेटला सुरक्षित आणि दीर्घकालीन संपत्तीमध्ये वेल्थ क्रिएटर म्हणून पाहत आहेत. उत्साहवर्धक गोष्ट ही आहे की मिड-सेगमेंटची मजबुती वाढत आहे आणि शहरांमध्ये नवीन विकास हब्स उदयास येत आहेत. जे डेव्हलपर्स मूल्य, जागा आणि कनेक्टिव्हिटी देऊ शकतात, ते या नवीन विश्वासाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यास आघाडीवर असतील," अशी प्रतिक्रिया मॅजिकब्रिक्सचे सीईओ सुधीर पै यांनी दिली.
