Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड

तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड

Micro Systematic Investment Plan : म्युच्युअल फंडात एसआयपी करण्यासाठी मोठी रक्कम लागते असं अनेकांना वाटतं. पण, तुम्ही अगदी ५० किंवा रुपयांमध्येही गुंतवणूक करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 15:02 IST2025-10-12T15:01:34+5:302025-10-12T15:02:21+5:30

Micro Systematic Investment Plan : म्युच्युअल फंडात एसआयपी करण्यासाठी मोठी रक्कम लागते असं अनेकांना वाटतं. पण, तुम्ही अगदी ५० किंवा रुपयांमध्येही गुंतवणूक करू शकता.

Micro SIP for Beginners Start Investing in Mutual Funds with Just ₹10 Daily for Long-Term Wealth | तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड

तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड

Micro SIP : प्रत्येकाला गुंतवणूक करण्याची इच्छा असते. पण, खर्च इतका वाढला आहे की बचतीसाठी पैसेच उरत नाही. तुमचीही अशीच अवस्था असेल तर काळजी करू नका. आता विद्यार्थी, डिलिव्हरी करणारे गिग वर्कर्स आणि रोजंदारीवर काम करणारे मजूरसुद्धा 'मायक्रो एयआयपी' च्या मदतीने हळूहळू एक मजबूत आर्थिक आधार तयार करत आहेत.

केवळ १० किंवा ५० रुपये सारखी अगदी छोटी रक्कमही दीर्घकाळात मोठा फरक घडवून आणू शकते. पारंपारिक म्युच्युअल फंड केवळ मोठ्या गुंतवणूकदारांसाठी आहेत, हा समज मायक्रो एसआयपीमुळे दूर झाला आहे. लहान रक्कम नियमितपणे गुंतवल्यास चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो आणि हळूहळू मोठी रक्कम जमा होते, असे वित्तीय सल्लागारांचे मत आहे.

मायक्रो SIP म्हणजे काय आणि ते कसे काम करते?
मायक्रो एसआयपी हा पारंपरिक SIP चा लहान अवतार आहे.
गुंतवणुकीची रक्कम: सामान्य एसआयपीसाठी किमान ५०० रुपये मासिक गुंतवणूक आवश्यक असते, तर मायक्रो SIP फक्त ५० किंवा १०० रुपयांपासून सुरू करता येते.
लवचिकता: गुंतवणूकदार आपल्या सोयीनुसार दररोज, साप्ताहिक किंवा मासिक आधारावर ही गुंतवणूक करू शकतात. या लवचिकतेमुळे छोट्या गुंतवणूकदारांना कोणताही दबाव न घेता बचत करण्याची प्रेरणा मिळते.

छोट्या गुंतवणुकीतून मोठी वाढ

दररोजची गुंतवणूकमासिक गुंतवणूक (अंदाजे)५ वर्षांत अंदाजित रक्कम (१२% परतावा)
₹१०₹३००₹२५,००० हून अधिक
₹२०₹६००₹५०,००० हून अधिक
₹५०₹१,५००₹१ लाख हून अधिक

हे आकडे दर्शवतात की, हळूहळू आणि नियमितपणे केलेली गुंतवणूक भविष्यात किती प्रभावी ठरू शकते.

कोणासाठी आहे मायक्रो एसआयपी उत्तम?
ज्या लोकांचे उत्पन्न नियमित नाही किंवा जे फार मोठी बचत करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी मायक्रो एसआयपी खूप उपयुक्त आहे.

  • विद्यार्थी: पॉकेटमनीतून छोटी बचत करू शकतात.
  • गिग वर्कर्स/फ्रीलांसर: प्रत्येक डिलिव्हरी किंवा कामाच्या बदल्यात मिळालेल्या उत्पन्नाचा छोटा हिस्सा गुंतवू शकतात.
  • रोजंदारीवरील कामगार: दररोजच्या कमाईतून छोटी रक्कम बाजूला ठेवून फंड तयार करू शकतात.

चक्रवाढ व्याजाची जादू
मायक्रो एसआयपीचा खरा फायदा म्हणजे चक्रवाढ व्याज. एकदा मिळालेला परतावा पुन्हा गुंतवला जातो, ज्यामुळे तो आणखी परतावा निर्माण करतो. म्हणूनच, तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तेवढा जास्त फायदा दीर्घकाळात मिळतो. यामुळे भविष्यात निवृत्ती, मुलांचे शिक्षण किंवा इतर मोठ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होते.
बाजार तज्ज्ञांच्या मते, मायक्रो एसआयपीला लगेच पैसे कमावण्याचे माध्यम न मानता, दीर्घकाळ बचत आणि आर्थिक शिस्त लावण्यासाठी एक महत्त्वाचे साधन मानले पाहिजे.

वाचा - नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : माइक्रो एसआईपी: छात्रों और गिग वर्कर्स के लिए करोड़पति बनने का नया चलन!

Web Summary : माइक्रो एसआईपी छात्रों, गिग वर्कर्स को ₹10 जैसी छोटी राशि का निवेश करने और समय के साथ धन बनाने में मदद करता है। जल्दी शुरुआत करने से चक्रवृद्धि ब्याज का लाभ मिलता है, जो भविष्य के वित्तीय लक्ष्यों में सहायक है। यह वित्तीय अनुशासन का उपकरण है, तत्काल धन का नहीं।

Web Title : Micro SIP: A new trend for students and gig workers to become millionaires.

Web Summary : Micro SIPs empower students, gig workers to invest small amounts like ₹10, building wealth over time. Starting early leverages compounding, aiding future financial goals. It's a tool for financial discipline, not instant riches.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.