Instagram-WhatsApp News: फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाला आपले दोन प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम विकावे लागू शकतात. याचं कारण म्हणजे अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये कंपनीविरोधात अँटीट्रस्ट खटल्याची सुनावणी.
बाजारातील स्पर्धा संपुष्टात आणण्यासाठी आणि स्वत:ची मक्तेदारी निर्माण करण्यासाठी २०१२ मध्ये इन्स्टाग्राम (१ बिलियन डॉलर) आणि २०१४ मध्ये व्हॉट्सअॅप (२२ बिलियन डॉलर) खरेदी केल्याचा आरोप यूएस कॉम्पिटिशन अँड कन्झ्युमर वॉच डॉगनं कंपनीवर केला आहे.
... तर प्लॅटफॉर्म विकावा लागू शकतो
फेडरल ट्रेड कमिशनने (एफटीसी) व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. परंतु नियमांनुसार एफटीसीला कराराच्या परिणामांवरही लक्ष ठेवावं लागतं. त्यामुळे त्यांना मेटाविरोधात गुन्हा दाखल करावा लागला. एफटीसीनं हा खटला जिंकला तर मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप दोन्ही विकण्यास भाग पाडलं जाऊ शकतं.
झुकेरबर्ग, माजी सीओओला चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान झुकेरबर्ग आणि कंपनीच्या माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) शेरिल सँडबर्ग या दोघांनाही चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. या अँटी ट्रस्ट प्रकरणाची सुनावणी ६ आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालणार आहे.
झुकेरबर्गविरोधात युक्तिवाद
- वँडरबिल्ट लॉ स्कूलमधील अँटीट्रस्टच्या प्राध्यापक रेबेका हॉ एलेन्सवर्थ म्हणाल्या की, झुकेरबर्ग यांनी इन्स्टाग्रामची स्पर्धा कमी करण्यासाठी फेसबुक विकत घेतलं.
- झुकेरबर्ग यांचं संभाषण आणि त्यांचे ईमेल या खटल्यातील सर्वात खात्रीशीर पुरावे देऊ शकतात. बाजारात स्पर्धा करण्यापेक्षा ती कंपनी विकत घेणं चांगलं, असं झुकेरबर्ग म्हणाले होते.
मार्क झुकेरबर्ग यांचा युक्तिवाद...
- हा खटला आपण जिंकू, असा युक्तिवाद मेटान केला, कारण इन्स्टाग्राम विकत घेतल्यानंतर त्याच्या युजर्सचा एक्सपिरिअन्स वाढला.
- अहवालानुसार, मेटा असा युक्तिवाद करू शकते की अँटीट्रस्ट प्रकरणात हेतू फारसा प्रासंगिक नाही.