Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?

Stock Market Today: जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारानं जोरदार सुरुवात केली. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स २१३.८१ अंकांनी वाढून ८२,४००.६२ वर व्यवहार करत होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 10:07 IST2025-07-23T10:07:00+5:302025-07-23T10:07:00+5:30

Stock Market Today: जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारानं जोरदार सुरुवात केली. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स २१३.८१ अंकांनी वाढून ८२,४००.६२ वर व्यवहार करत होता.

mcx tech glitch Stock Market Today starts with a bullish Sensex jumps more than 200 points which stocks shined | Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?

Stock Market Today: जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारानं जोरदार सुरुवात केली. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स २१३.८१ अंकांनी वाढून ८२,४००.६२ वर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, एनएसईचा निफ्टी देखील ६४.६५ अंकांच्या वाढीसह २५,१२५.५५ च्या पातळीवर होता. आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टीवर भारती एअरटेल, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, श्रीराम फायनान्स, जिओ फायनान्शियलचे शेअर्स सर्वाधिक वधारले, तर ओएनजीसी, हिरो मोटोकॉर्प, टाटा स्टील, टाटा कंझ्युमर आणि सिप्ला यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. सुमारे १६० शेअर्स वधारले, ७१ शेअर्स घसरले आणि २२ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.

बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल

आशियाई शेअर बाजारात मोठी तेजी

बुधवारी आशियाई शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून आली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपान आणि अमेरिकेदरम्यान टॅरिफ कराराची घोषणा केल्यानंतर टोक्योचा प्रमुख निक्केई २२५ निर्देशांक ३% पेक्षा जास्त वधारला. या नवीन कराराअंतर्गत, जपानमधून आयात केलेल्या बहुतेक उत्पादनांवर आता १५% शुल्क आकारलं जाईल, तर यापूर्वी ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून २५% शुल्क लादण्याची धमकी दिली होती. तथापि, स्टील आणि अॅल्युमिनियमसारख्या काही उत्पादनांवर पूर्वीप्रमाणेच उच्च शुल्क कायम राहील.

आज, हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १.१% वाढून २५,३९७.८१ वर, चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.८% वाढून ३,६०८.५८ वर, ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी/एएसएक्स २०० निर्देशांक ०.६% वाढून ८,७३१.९० वर, दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक ०.१% वाढून ३,१७२.१० वर बंद झाला. अमेरिका आणि जपानमधील या टॅरिफ करारामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण होत आहे आणि भविष्यात बाजारपेठेत स्थिरता आणण्यास मदत होऊ शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे.

Web Title: mcx tech glitch Stock Market Today starts with a bullish Sensex jumps more than 200 points which stocks shined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.