Lokmat Money > बिझनेस न्यूज > वर्षाच्या पहिल्या दिवशी जोरदार रिकव्हरी! निफ्टी 23700 च्या वर बंद, 'या' शेअर्सची चमकदार कामगिरी

वर्षाच्या पहिल्या दिवशी जोरदार रिकव्हरी! निफ्टी 23700 च्या वर बंद, 'या' शेअर्सची चमकदार कामगिरी

Share market : गेल्या डिसेंबरमध्ये अस्थिर असलेल्या शेअर बाजाराने नव्या वर्षाचे स्वागत मात्र धमाक्यात केलं आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही वाढीसह बंद झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 16:26 IST2025-01-01T16:26:20+5:302025-01-01T16:26:20+5:30

Share market : गेल्या डिसेंबरमध्ये अस्थिर असलेल्या शेअर बाजाराने नव्या वर्षाचे स्वागत मात्र धमाक्यात केलं आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही वाढीसह बंद झाले.

market today sensex and nifty recover and ends in green on first day of 2025 | वर्षाच्या पहिल्या दिवशी जोरदार रिकव्हरी! निफ्टी 23700 च्या वर बंद, 'या' शेअर्सची चमकदार कामगिरी

वर्षाच्या पहिल्या दिवशी जोरदार रिकव्हरी! निफ्टी 23700 च्या वर बंद, 'या' शेअर्सची चमकदार कामगिरी

Share market : देशांतर्गत शेअर बाजाराने बुधवारी नवीन वर्षाचे जोरदार स्वागत केले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार आपल्या खालच्या पातळीवरून सावरला आणि वाढीसह बंद झाला. बुधवारच्या व्यवहारात सेन्सेक्स ३६८ अंकांच्या वाढीसह ७८५०७ वर तर निफ्टी ९८ अंकांच्या वाढीसह २३७४३ वर बंद झाला. आजच्या व्यवसायात सर्वात मोठी वाढ ऑटो क्षेत्राच्या निर्देशांकात दिसून आली आहे, निर्देशांक एक टक्क्यांहून अधिक वाढला आहे. दुसरीकडे रिअल्टी क्षेत्राच्या निर्देशांकात एक टक्क्याहून अधिक घसरण दिसून आली आहे.

बाजार का सावरला?
एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमधील रिकव्हरीमुळे शेअर बाजारातील आजच्या रिकव्हरीला मदत झाली. आजच्या सत्रात, एचडीएफसी बँकेने खालच्या पातळीवरून सुमारे २ टक्के आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने खालच्या पातळीवरून एक टक्के वसुली केली आहे. याशिवाय मारुतीच्या विक्रीच्या आकड्यांमुळे उत्साहित झालेल्या गुंतवणूकदारांनी शेअर खरेदी केले आणि शेअर २ टक्क्यांहून अधिक वाढला. M&M आणि टाटा मोटर्स सारख्या ऑटो क्षेत्रातील दिग्गजांच्या वाढीचाही बाजाराला फायदा झाला. आज केवळ देशांतर्गत बाजारपेठा खुल्या आहेत, त्यामुळे आजच्या व्यवसायात परदेशी गुंतवणूकदारांच्या कृतींचा प्रभाव मर्यादित असण्याची शक्यता आहे. देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या कृतीमुळे रिकव्हरीला दिशा मिळाली. अशा स्थितीत २ जानेवारीपासून बाजारासाठी पुन्हा एकदा परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावं?
बाजार तज्ज्ञांच्या मते, निफ्टीचा पुढील रेजिस्टेन्स २३८५०-२३९०० आहे. त्यांच्या मते हा बाजाराचा सध्याचा सर्वात महत्त्वाचा स्तर आहे. ही पातळी तुटल्यास बाजारात शॉर्ट कव्हरिंग वाढेल. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मोठा ट्रेड खाली आहे. अशा परिस्थितीत, आजची रिकव्हरी पाहून आनंदी होण्याची गरज नाही. तसेच या ट्रेंडला फॉलो करण्याची गरज नाही, दुसरीकडे, बँक निफ्टीने आज सलग तिसऱ्या दिवशी २०० डीएमए वाचवले आहेत. सध्या ५१५०० ते ५१८०० ही पातळी बँक निफ्टीसाठी पुढील रेजिस्टेन्स आहे. सध्या बाजार वेगवेगळे संकेत देईल. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतरच दिशा ठरवली जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

(डिस्क्लेमर : यात शेअर बाजारातील परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. हा कुठल्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला नाही. कुठल्याही गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)

Web Title: market today sensex and nifty recover and ends in green on first day of 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.