Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Nvidia ची '५ ट्रिलियन डॉलर' क्लबमध्ये एन्ट्री! कंपनीची किंमत १९० देशांच्या GDP पेक्षा जास्त

Nvidia ची '५ ट्रिलियन डॉलर' क्लबमध्ये एन्ट्री! कंपनीची किंमत १९० देशांच्या GDP पेक्षा जास्त

Market Cap vs GDP : एनव्हीडियाचे मार्केट कॅप ५ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचे वृत्त आहे, मग कंपनी कमी जीडीपी असलेल्या देशांना खरेदी करू शकते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:53 IST2025-10-30T14:26:32+5:302025-10-30T15:53:50+5:30

Market Cap vs GDP : एनव्हीडियाचे मार्केट कॅप ५ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचे वृत्त आहे, मग कंपनी कमी जीडीपी असलेल्या देशांना खरेदी करू शकते का?

Market Cap vs GDP Explained Understanding Why Nvidia's $5 Trillion Valuation Doesn't Mean It Can Purchase a Nation | Nvidia ची '५ ट्रिलियन डॉलर' क्लबमध्ये एन्ट्री! कंपनीची किंमत १९० देशांच्या GDP पेक्षा जास्त

Nvidia ची '५ ट्रिलियन डॉलर' क्लबमध्ये एन्ट्री! कंपनीची किंमत १९० देशांच्या GDP पेक्षा जास्त

Nvidia Market Cap : चिप आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी एनव्हीडीयाने नुकताच एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. कंपनीचे बाजार भांडवल प्रथमच ५ ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले आहे. या मूल्यांकनापर्यंत आजपर्यंत कोणतीही कंपनी पोहोचलेली नाही. एनव्हीडीयाचे हे मार्केट कॅप जगातील जवळपास १९० देशांच्या एकूण जीडीपीपेक्षा जास्त आहे. जगात केवळ दोनच देश अमेरिका आणि चीन आहेत, ज्यांचा जीडीपी ५ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. या पार्श्वभूमीवर, असा प्रश्न उपस्थित होतो की, एनव्हीडीया आपल्यापेक्षा कमी जीडीपी असलेल्या देशांना खरंच विकत घेऊ शकते का?

भारत आणि जगावर परिणाम
भारत सरकारने आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याचा अर्थ, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपानसह जगातील अनेक मोठ्या देशांचा जीडीपी आज एनव्हीडीयाच्या मार्केट कॅपपेक्षा कमी आहे.
एनव्हीडीयापेक्षा पुढे असलेले देश: अमेरिका (३०.४ ट्रिलियन डॉलर) आणि चीन (१९.३ ट्रिलियन डॉलर). यावरून, एनव्हीडीया सारखी कंपनी ब्रिटन किंवा फ्रान्ससारखे देश विकत घेऊ शकते का, याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे. या दाव्यामध्ये किती सत्यता आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

मार्केट कॅप म्हणजे काय?
सर्वात आधी, मार्केट कॅप म्हणजे काय, हे समजून घेऊया. हे कोणत्याही कंपनीच्या एकूण शेअर्सचे मूल्य असते. याचा अर्थ कंपनीकडे रोख किती आहे, याच्याशी नसतो. एनव्हीडीयाचे मार्केट कॅप ५ ट्रिलियन डॉलर असले तरी, कंपनीकडे प्रत्यक्ष रोख रक्कम सुमारे ४.१९ लाख कोटी रुपये आहे, जी तिच्या मार्केट कॅपच्या १००० व्या भागापेक्षाही कमी आहे.

जीडीपी म्हणजे काय?
ज्याप्रमाणे मार्केट कॅप हे कंपनीचे केवळ इक्विटी मूल्य असते, रोख रक्कम नव्हे; त्याचप्रमाणे देशाचा जीडीपी म्हणजे त्याचे सकल देशांतर्गत उत्पादन असते. जीडीपी हे देशाची किंमत नव्हे, तर एका वर्षात देशात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या किमतीचा आकडा असतो. ज्या देशाचा जीडीपी ५ ट्रिलियन डॉलरपेक्षा कमी आहे, याचा अर्थ त्याची एकूण किंमत त्याहून कमी आहे, असा होत नाही. एका देशामध्ये जमीन, इमारती, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि इतर वारसा यांचा समावेश असतो, ज्याचे मूल्य जीडीपीपेक्षा कितीतरी जास्त असते.

एखादा देश विकत घेणे शक्य आहे का?
एखादी खासगी कंपनी किंवा व्यक्ती कोणत्याही सार्वभौम देशाला विकत घेऊ शकत नाही. कोणत्याही देशाला विकणे किंवा खरेदी करणे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार शक्य नाही. कारण देशात केवळ मालमत्ता नाही, तर लोक (नागरिक) देखील समाविष्ट असतात. एनव्हीडीयासारखी कंपनी जगात कुठेही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकते, कारखाने उभे करू शकते, पण त्या देशाला विकत घेणे तिच्यासाठी शक्य नाही आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ते वैधही नाही.

वाचा - टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी

त्यामुळे, एनव्हीडीयाचे मूल्यांकन जगातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त असले तरी, ती ब्रिटन किंवा जर्मनीसारख्या देशांना विकत घेऊ शकत नाही, हे स्पष्ट आहे.

Web Title: Market Cap vs GDP Explained Understanding Why Nvidia's $5 Trillion Valuation Doesn't Mean It Can Purchase a Nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.