Maharashtra Budget 2026-2027 Devendra Fadnavis Speech Live Updates in Marathi: राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून चालू आर्थिक वर्षात ती ७.९ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज २०२५-२६ च्या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आला आहे. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील संतुलित वाढ, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेसाठी केलेल्या सुधारणांमुळे राज्याची आर्थिक स्पर्धात्मकता अधिक बळकट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
LIVE
07 Mar, 26 : 09:32 AM
Maharashtra Budget 2026 Live: नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रनगरी उभारली जाणार
मुंबई, दुबई, सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करणार; ५० पर्यटनस्थळांवर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. याशिवाय नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रनगरी उभारली जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
06 Mar, 26 : 03:36 PM
Maharashtra Budget 2026 Live: बळीराजा, उद्योजकांच्या निमित्तानं हा अर्थसंकल्प सकारात्मक होता - उदय सामंत
बळीराजा, उद्योजकांच्या निमित्तानं हा अर्थसंकल्प सकारात्मक होता. या अर्थसंकल्पातून नक्कीच महाराष्ट्र जागतीक पातळीवर आर्थिक व्यवस्थेशी मुकाबला करू शकतो असा हा अर्थसंकल्प होता.
06 Mar, 26 : 03:33 PM
अटीशर्थींविना ५ लाखांपर्यंत कर्जमाफी द्या - शेतकरी नेते रविकांत तुपकर
राज्य सरकारनं आज कर्जमाफीची घोषणा केली. पण या घोषणेनं आम्ही समाधानी नाही. दीड वर्षांनंतर कर्जमाफीची घोषणा होत आहे. शेतकरी आंदोलनामुळे ही कर्जमाफी करण्यात आली. २ लाखांपर्यंतची कर्जमाफी करू असा निर्णय आज जाहीर केला. कोणत्याही जाचक अटी आणि निकषांशिवाय ५ लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी व्हावी अशी आमची मागणी आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली.
06 Mar, 26 : 03:23 PM
Maharashtra Budget 2026 Live: राजकोषीय सुधारणांमध्ये राज्य कायम अग्रेसर
राजकोषीय सुधारणांमध्ये राज्य कायम अग्रेसर राहिलं आहे. राजकोषीय उत्तरदायीत्व आणि वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राजकोषीय तुट स्थुलराज्य उत्पन्नाच्या ३ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात शासन यशस्वी. तसंच राज्याची महसूली तुट ही स्थुल राज्य उत्पन्नाच्या १ टक्क्यापेक्षा कमी. २०६-२७ ची राजकोषीय तुट १ लाख ५० हजार ४९१ कोटी रुपये आहे.
06 Mar, 26 : 03:21 PM
Maharashtra Budget 2026 Live: राज्याचा महसूल वाढीचा दर देशाच्या सरासरीहून अधिक
राज्याचा महसूल वाढीचा दर देशाच्या सरासरीहून अधिक. ६ लाख ८९ हजार महसुली जमा अपेक्षित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याशिवाय जिल्हा वार्षिक तरतुदीत भरीव वाढ करण्यात आली.
06 Mar, 26 : 03:17 PM
Maharashtra Budget 2026 Live: राज्याला कृत्रिम बुद्धीमत्तेत जागतिक केंद्र बनवणार - फडणवीस
जमिनीचे व्यवहार १०० टक्के संगणकीकृत करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याशिवाय कृत्रीम बुद्धीमत्ता विभाग सुरू केला जाणार. राज्याला कृत्रिम बुद्धीमत्तेत जागतिक केंद्र बनवणार.
06 Mar, 26 : 03:13 PM
Maharashtra Budget 2026 Live: राज्यातील लाडकी बहीण योजना सुरू राहणार
राज्यातील लाडकी बहीण योजना ही अशीच कायम सुरू ठेवणार असल्याची माहिती अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासाठी आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं. एकल महिलांच्या कल्याणसाठी लवकरच धोरण आणण्यात येणार असून २५ लाख दीदींना लखपती करण्याचं उद्दिष्ट असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं.
06 Mar, 26 : 03:10 PM
Maharashtra Budget 2026 Live: आदिवासी घटक कार्यक्रमासाठी २१ हजार कोटी रुपये प्रस्तावित
आदिवासी घटक कार्यक्रमासाठी २१ हजार कोटी रुपये प्रस्तावित असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. अनुसुचित जातींसाठी २०२६-२७ या वर्षात २३ हजार १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
06 Mar, 26 : 03:04 PM
Maharashtra Budget 2026 Live: नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड स्थापन करणार
नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड स्थापन करणार. निवडक स्टार्टअप्सना थेट मदत केली जाणार आहे. सर्वोत्तम स्टार्टअप्सची निवड करून त्यांचे प्रकल्प शासकीय विभागात राबवण्यासाठी २५ लाखांपर्यंतची कामं निविदेशिवाय थेट देणार.
06 Mar, 26 : 03:02 PM
Maharashtra Budget 2026 Live: युनिकॉर्नच्या संख्येतही महाराष्ट्र देशात प्रथम - फडणवीस
युनिकॉर्नच्या संख्येतही महाराष्ट्र देशात प्रथम. राज्याला जागतिक केंद्र बनवण्यासाठी नवीन स्टार्ट आणि नाविन्यता धोरण सुरू केलंय. पुढील ५ वर्षांत १ लाख २५ हजार उद्योजक घडवणं आणि ५० हजार स्टार्टअप्सना बळ देणं हे उद्दिष्ट्य.
06 Mar, 26 : 02:56 PM
Maharashtra Budget 2026 Live: २ लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी
जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. यासोबतच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेण्यात येणार. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता, त्याला कायमचा कर्जमुक्त करण्याचा संकल्प. समितीच्या शिफारसींनुसार उपाययोजना सुरू. २ लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकलेल्या कर्जाची माफी.
06 Mar, 26 : 02:48 PM
Maharashtra Budget 2026 Live: २०२६ मध्ये अलनिनोमुळे मान्सूनवर परिणाम होऊन दृष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या अनेक संस्थांनी २०२६ मध्ये अलनिनोमुळे मान्सूनवर परिणाम होऊन दृष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्ती केली आहे. त्यादृष्टीनं पिण्याचं पाणी राखून ठेवणं, जलयुक्त शिवार आणि जलंसधारण योजनेच्या माध्यमातून पाण्याचं सवर्धनाकरता उपाययोजना केल्या जात आहेत.
06 Mar, 26 : 02:45 PM
Maharashtra Budget 2026 Live: सौर कृषिपंप योजनेची गिनिज बुक मध्ये नोंद
२०२७ मध्येही मुख्यमंत्री बळीराजा योजना सुरू राहणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या योजनेअंतर्गत १०० टक्के वीज बिल सवलत देण्यात येत आहे. याशिवाय मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेअंतर्गत ६ लाखाहून अधिक पंप देण्यात आल्याचं ते म्हणाले. सौर कृषिपंप योजनेची गिनिज बुक मध्ये नोंद करण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं.
06 Mar, 26 : 02:39 PM
Maharashtra Budget 2026 Live: शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित संरेखनाला मान्यता
महाराष्ट्र अमृतकाल योजनेत २०४७ पर्यंत टप्प्या टप्प्यानं रस्त्यांचा विकास केला जाणार. शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित संरेखनाला मान्यता देण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया मुंबई मेट्रो मार्गिका ११ हा २३,४८७ कोटी रुपये किंमतीचा भूमिगत प्रकल्प हाती. या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पासून वांद्रे टर्मिनर्सपर्यंत करण्याचे नियोजन असल्याचं फडणवीस म्हणाले..
06 Mar, 26 : 02:35 PM
Maharashtra Budget 2026 Live: मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ जोडण्यासाठी मुंबई मेट्रो मार्ग ८
मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग ८ हा २२,८६२ कोटींचा मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात येणार. तळोजा ते खांदेश्वर या ५५७५ कोटींच्या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूकीत सुधारणा होईल. रस्त्यावरील वाहतुककोंडी कमी करण्यासाठी मुंबई पुण्यात भुयारी मार्ग उभारण्याचा मानस
06 Mar, 26 : 02:31 PM
Maharashtra Budget 2026 Live: मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये ४९० किलोमीटरच्या मेट्रोचं काम हाती
२०३० पर्यंत एमएमआरची अर्थव्यवस्था ३०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेणार असल्याचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. याशिवाय अटल सेतूच्या परिसरात तिसरी मुंबई विकसित केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये ४९० किलोमीटरच्या मेट्रोचं काम हाती घेण्यात आलंय. त्य़ापैकी १७३ किमीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या. आगामी वर्षात आणखी ५० किमीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या होणार,
06 Mar, 26 : 02:29 PM
Maharashtra Budget 2026 Live: नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रनगरी उभारली जाणार
मुंबई, दुबई, सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करणार; ५० पर्यटनस्थळांवर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. याशिवाय नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रनगरी उभारली जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
06 Mar, 26 : 02:22 PM
Maharashtra Budget 2026 Live: मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेस मान्यता
संयुक्त राष्ट्रानं हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलंय. त्या निमित्त महिला गोपालक, कुक्कुटपालक आणि महिला शेळीपालकांसाठी विशेष प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवण्यात येणार. मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी दरवर्षी १२४० कोटी रुपये आर्थिक भाराच्या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेस मान्यता देण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले.
06 Mar, 26 : 02:17 PM
Maharashtra Budget 2026 Live: कृषीक्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवणार
कृषीक्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा तयार केल्या जाणार आहेत. १० ते १५ पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार केली जाईल.२ वर्षांत महाराष्ट्र शेती नैसर्गिक अभियान या नव्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्यात येईल.
06 Mar, 26 : 02:17 PM
Maharashtra Budget 2026 Live: मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना सुरू होणार
राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा २५ टक्के आहे. ही व्याप्ती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू केली जाणार आहे. पशुसंवर्धन आणि मत्सव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आलाय. त्यामुळे यालाही कृषीप्रमाणे सर्व पायाभूत सुविधा आणि सवलती मिळतील.
06 Mar, 26 : 02:15 PM
Maharashtra Budget 2026 Live: स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा ही मेसेज सेवा
स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम केल्या जाणार असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा ही मेसेज सेवा सुरू केली जाणार. डिजिटल सेवांद्वारे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार असल्याचं अर्थमंत्री फडणवीस म्हणाले.
06 Mar, 26 : 02:11 PM
Maharashtra Budget 2026 Live: "२०४७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर नेणार"
२०४७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर नेणार असा विश्वास अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. २०३५ मध्ये राज्याचा अमृत महोत्सव, यासाठी काही उद्दिष्टे निश्चित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
06 Mar, 26 : 02:09 PM
Maharashtra Budget 2026 Live: आजचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित - देवेंद्र फडणवीस
बाळासाहेबांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आजचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित असल्याचं ते म्हणाले. गतीमान नागरी पुरस्कार अजित दादांच्या नावे, त्यांना साजेसं स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली.
06 Mar, 26 : 02:05 PM
Maharashtra Budget 2026 Live: संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट उभारण्यात येणार - फडणवीस
महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जन्माला ११ एप्रिल रोजी २०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. याशिवाय संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट उभारण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
06 Mar, 26 : 01:50 PM
Maharashtra Budget 2026 Live: ... तर त्यांनी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांचा विक्रम त्यांनी मोडला असता
दादा असते तर त्यांनी आज राज्याचा १२ व्यांदा अर्थसंकल्प मांडला असता. २ अर्थसंकल्प झाले असते, तर त्यांनी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांचा विक्रम त्यांनी मोडला असता. या अर्थसंकल्पात अजित दादांनी ६ मार्चलाच अर्थसंकल्प मांडण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. त्यांनी दादांनीच निवडलेली तारीख ठेवली आणि ते आज अर्थसंकल्प सादर करताहेत. यात दादांच्या ज्या भावना होत्या, त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
06 Mar, 26 : 01:45 PM
दादा अर्थसंकल्प मांडायला सभागृहात नसणं, यापेक्षा.. मिटकरी झाले भावूक
दादा अर्थसंकल्प मांडायला सभागृहात नसणं, यापेक्षा महाराष्ट्रासाठी कोणताही वाईट क्षण असू शकत नाही. त्यांच्याशिवाय सर्व काही सूनं सूनं वाटत आहे, वाईट वाटत आहे, असं म्हणत आमदार अमोल मिटकरी यांनी दिवंगत अर्थमंत्री अजित पवार यांची आठवण काढली.
06 Mar, 26 : 01:40 PM
फडणवीसांची खूप वर्षापासून अर्थसंकल्प सादर करण्याची इच्छा होती ती पूर्ण झालीय- नाना पटोले
फडणवीस यांना खूप वर्षांपासून अर्थसंकल्प मांडण्याची इच्छा होती. अर्थखातं मुख्यमंत्र्यांकडे द्यायचं असा प्रयत्न अजित पवार असतानाच सुरू झाला होता, असा मी अजून एक गौप्यस्फोट करतो. त्यांचा मत्यू अपघातानं झाला की घातपात होता हा चर्चेचा विषय आहे. पहिल्यांदा फडणवीसांचं स्वप्न पूर्ण झालंय. माझ्या मित्राला मी शुभेच्छा देतो. राज्याताली शेतकऱ्याला, गरीबाला, बेरोजगाराला, राज्यातील जनतेला न्याय मिळाला पाहिजे अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
06 Mar, 26 : 01:33 PM
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात
अर्थसंकल्पापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
06 Mar, 26 : 12:54 PM
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचं छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थ राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं.#Maharashtra#Budget#maharashtrabudget#DevendraFadnavispic.twitter.com/v3rV25ol1p
— Lokmat (@lokmat) March 6, 2026
06 Mar, 26 : 12:44 PM
अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानभवनात दाखल
अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानभवनात दाखल झाले आहेत.

06 Mar, 26 : 12:30 PM
"...तेव्हा जलद प्रगतीच्या मार्गावर नेण्याची आमची वचनबद्धता दिसून येईल"
"कृपया अर्थसंकल्पाची वाट पहा. दुपारी २ वाजता विधानसभेत महाराष्ट्रातील जनतेसमोर अर्थसंकल्प सादर केला जाईल तेव्हा तुम्हाला महाराष्ट्राला विकासाच्या आणि जलद प्रगतीच्या मार्गावर नेण्याची आमची वचनबद्धता दिसून येईल," अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी अर्थसंकल्पापूर्वी दिली.
Mumbai, Maharashtra: State Minister Ashish Jaiswal says, "Please wait for the budget. When the budget is presented before the people of Maharashtra through the Assembly at 2 PM, you will see our commitment to taking Maharashtra forward on the path of development and rapid… pic.twitter.com/20vgUM66aa
— IANS (@ians_india) March 6, 2026
06 Mar, 26 : 12:27 PM
देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा
पहिल्या सुधारित अंदाजानुसार २०२४-२५ मध्ये देशाच्या सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा १४% असून तो देशातील सर्वाधिक आहे. राज्यात रस्ते, मेट्रो, बंदरं, विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधांचा विकास वेगानं होत असल्याचं अहवालात नमूद केलंय.
06 Mar, 26 : 12:25 PM
अर्थव्यवस्था ७.९ टक्के दरानं वाढणार असल्याचा अंदाज
राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून चालू आर्थिक वर्षात ती ७.९ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज २०२५-२६ च्या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आला आहे. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील संतुलित वाढ, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेसाठी केलेल्या सुधारणांमुळे राज्याची आर्थिक स्पर्धात्मकता अधिक बळकट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
