Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा

LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा

LPG Cylinder Rate Today: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरकारच्या माहितीनुसार, एलपीजी घेऊन येणारी भारताची दोन जहाजे होर्मुज सामुद्रधुनी सुरक्षितपणे ओलांडून आता लवकरच देशात पोहोचणार आहेत. दरम्यान, पाहा काय आहेत सिलिंडरचे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 08:48 IST2026-04-07T08:46:52+5:302026-04-07T08:48:57+5:30

LPG Cylinder Rate Today: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरकारच्या माहितीनुसार, एलपीजी घेऊन येणारी भारताची दोन जहाजे होर्मुज सामुद्रधुनी सुरक्षितपणे ओलांडून आता लवकरच देशात पोहोचणार आहेत. दरम्यान, पाहा काय आहेत सिलिंडरचे दर.

LPG Price Today What is the update on the price of LPG cylinders today Check delhi to mumbai price quickly | LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा

LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा

LPG Cylinder Rate Today: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरकारच्या माहितीनुसार, एलपीजी घेऊन येणारी भारताची दोन जहाजे होर्मुज सामुद्रधुनी सुरक्षितपणे ओलांडून आता लवकरच देशात पोहोचणार आहेत. 'ग्रीन साक्षी' आणि 'ग्रीन आशा' अशी या जहाजांची नावं असून ती भारताच्या ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत.

या दोन्ही जहाजांमध्ये मिळून ६० हजार टनांपेक्षा जास्त एलपीजी आहे. 'ग्रीन साक्षी' ७ एप्रिलपर्यंत आणि 'ग्रीन आशा' ९ एप्रिलपर्यंत भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. या खेपेमुळे घरगुती गॅसचा पुरवठा स्थिर राहण्यास मदत होईल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही जहाजे पूर्णपणे सुरक्षित असून त्यामध्ये भारतीय खलाशी आहेत. एका जहाजात सुमारे ४६ हजार टन आणि दुसऱ्या जहाजात सुमारे १५ हजार टन गॅस आहे.

Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स

घरगुती एलपीजी सिलिंडरचे ताजे दर

घरगुती वापरासाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत सध्या सुमारे ९१३ रुपये आहे. लहान कुटुंबांसाठी ५ किलोचा सिलेंडर ३३९ रुपयांत उपलब्ध आहे. याशिवाय, १० किलोच्या 'Xtralite' सिलेंडरची किंमत सुमारे ६५२.५ रुपये निश्चित करण्यात आली आहे.

कमर्शियल सिलिंडरचे दर

व्यावसायिक वापरासाठी दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत सुमारे २०७८.५ रुपये ते २३०७.५ रुपयांपर्यंत आहे. हॉटेल आणि उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ४७.५ किलो सिलेंडरची किंमत ५१९२ रुपये ते ५२४८ रुपयांच्या दरम्यान आहे. तसंच, सर्वात मोठ्या ४२५ किलो सिलेंडरची किंमत सुमारे ४६,४९७ रुपये ते ४६,९९९ रुपयांपर्यंत पोहोचलीये.

प्रमुख शहरांमधील दर (रुपये)
शहरघरगुती (१४.२ किलो)कमर्शियल (१९ किलो)
मुंबई९१२.५०२०३१
लखनौ९५०.५०२२०१
दिल्ली९१३२०७८.५०
जयपुर९१६.५०२०३१
कोलकाता९३९२२०८
चेन्नई९२८.५०२२४६.५०

लहान आणि विशेष सिलिंडरच्या किमती

लहान आणि विशेष वापराच्या सिलिंडरमध्ये २ किलो एलपीजी सिलिंडरचं रिफिल सुमारे २५४ रुपयांना मिळतं, तर नवीन सिलिंडर घेताना त्याची किंमत साधारण ९६२ रुपयांपर्यंत जाते. तसंच ५ किलोच्या नॉन-डोमेस्टिक सिलिंडरची किंमत सुमारे ५४९ रुपये ठेवण्यात आली आहे.

 

Web Title : एलपीजी की आज की कीमत: सिलेंडर की कीमतों पर नवीनतम अपडेट देखें।

Web Summary : अच्छी खबर! एलपीजी शिपमेंट जल्द आ रहा है, जिससे घरेलू गैस की आपूर्ति स्थिर हो जाएगी। दिल्ली में वर्तमान 14.2 किलो सिलेंडर की कीमत लगभग ₹913 है। वाणिज्यिक और छोटे सिलेंडर की दरें भी अलग-अलग हैं। शहर के अनुसार दरें अंदर देखें।

Web Title : LPG Price Today: Check the latest cylinder rates and updates.

Web Summary : Good news! LPG shipments are arriving soon, stabilizing domestic gas supply. Current 14.2 kg cylinder price in Delhi is around ₹913. Commercial and smaller cylinder rates also vary. Check city-wise rates inside.