LPG Supplier : जर तुम्ही तुमच्या सध्याच्या स्वयंपाकाच्या गॅस पुरवठादाराच्या सेवेवर समाधानी नसाल, तर लवकरच तुम्हाला मोठी सूट मिळणार आहे! मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीप्रमाणेच, आता एलपीजी गॅस ग्राहकांना त्यांचे सध्याचे कनेक्शन न बदलता गॅस कंपनी (सप्लायर) बदलण्याची परवानगी मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय आणि चांगली सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
या बदलासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने 'एलपीजी आंतर-कार्यक्षमता' या मसुद्यावर भागधारक आणि ग्राहकांकडून सूचना मागवल्या आहेत.
गॅस कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार
नियामक मंडळाने म्हटले आहे की, सध्या अनेकदा स्थानिक वितरकांना कार्यान्वयन संबंधित अडचणींचा सामना करावा लागतो, अशावेळी ग्राहकांकडे पर्याय मर्यादित असतात आणि त्यांना अनेकदा त्रासाला सामोरे जावे लागते.
पीएनजीआरबीने स्पष्ट केले आहे की, सिलेंडरची किंमत सारखी असताना, ग्राहकाला आपली एलपीजी कंपनी किंवा डीलर निवडण्याचे स्वातंत्र्य असावे.
यासाठीच एलपीजी पोर्टेबिलिटी आवश्यक आहे. ग्राहकांकडून सुचना मिळाल्यानंतर, पीएनजीआरबी या पोर्टेबिलिटीसाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल आणि देशात अंमलबजावणीची तारीख निश्चित करेल.
वाचा - दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
जुना नियम काय होता?
- पूर्वीच्या नियमांनुसार, एका विशिष्ट कंपनीचा एलपीजी सिलेंडर रिफिल करण्यासाठी तो त्याच कंपनीकडे जमा करणे बंधनकारक होते. त्यामुळे एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे पोर्टेबिलिटी करणे शक्य नव्हते.
- २०१३-१४ मध्ये सरकारने फक्त डीलर बदलण्याचा मर्यादित पर्याय दिला होता, पण कंपनी बदलण्याची परवानगी नव्हती.
- आता पीएनजीआरबी कंपन्यांमध्ये पोर्टेबिलिटीची परवानगी देण्याबद्दल बोलत आहे, ज्यामुळे सेवा खराब असलेल्या कंपन्यांना स्पर्धा करावी लागेल आणि ग्राहकांना चांगली सेवा मिळेल.
- नियामकाने ग्राहकांचा विश्वास जपण्यासाठी आणि एलपीजी पुरवठा सातत्य मजबूत करण्यासाठी ग्राहक, वितरक आणि नागरिक समाज संघटनांकडून उपाययोजना आणि सूचना मागवल्या आहेत.