Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > निर्यातदारांना बँकांकडून आता दीर्घ मुदतीचे कर्ज

निर्यातदारांना बँकांकडून आता दीर्घ मुदतीचे कर्ज

रिझर्व्ह बँकेने निर्यातदारांसाठी दिल्या जाणार्‍या कर्जाबाबत काही नियम शिथिल केले आहेत. बँकांना निर्यातदारांना दीर्घ काळासाठी कर्ज देण्याची परवानगी देण्यात आली

By admin | Updated: May 23, 2014 01:43 IST2014-05-23T01:43:40+5:302014-05-23T01:43:40+5:30

रिझर्व्ह बँकेने निर्यातदारांसाठी दिल्या जाणार्‍या कर्जाबाबत काही नियम शिथिल केले आहेत. बँकांना निर्यातदारांना दीर्घ काळासाठी कर्ज देण्याची परवानगी देण्यात आली

Long term loan from exporters to banks | निर्यातदारांना बँकांकडून आता दीर्घ मुदतीचे कर्ज

निर्यातदारांना बँकांकडून आता दीर्घ मुदतीचे कर्ज

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने निर्यातदारांसाठी दिल्या जाणार्‍या कर्जाबाबत काही नियम शिथिल केले आहेत. बँकांना निर्यातदारांना दीर्घ काळासाठी कर्ज देण्याची परवानगी देण्यात आली असून, या तरतुदीअंतर्गत १0 वर्षांपर्यंत कर्ज घेता येणार आहे. आत्तापर्यंत निर्यातदारांना १ वर्षाच्या मुदतीचेच कर्ज घेता येत होते. ज्या निर्यातदारांकडून कर्जाची नियमित परतफेड झाली आहे, अशा कर्जदारांना या नव्या सुविधेचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर अशा कर्जांवर बँका लंडन बँकेच्या आंतरबँकिंग कर्जाच्या व्याजदरापेक्षा २ टक्क्यांहून अधिक व्याज आकारू शकणार नाहीत. निर्यातदाराला रुपयातील कर्जखात्यात परतफेड करण्यासाठी या नव्या तरतुदीतील कर्जाचा वापर करता येणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Long term loan from exporters to banks