Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शहरात विजेचा लपंडाव नागरिक त्रस्त; वीज कंपनीचे अधिकारी सुस्त

शहरात विजेचा लपंडाव नागरिक त्रस्त; वीज कंपनीचे अधिकारी सुस्त

अकोला : ठरावीक कालावधीतच ग्राहकांजवळून नियमित वीज देयक वसूल करणार्‍या महावितरण कंपनीचे स्थानिक अधिकारी सुस्तावल्याचे चित्र आहे. ऐन उन्हाळ्यात रविवारी मध्यरात्री व पहाटेपर्यंत शहराच्या विविध भागात विजेचा लपंडाव सुरू होता. मध्यरात्री १२ वाजतापासून ते सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत महावितरण कंपनीने अकोलेकरांना अक्षरश: घामाघूम केले. या प्रकारामुळे अकोलेकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

By admin | Updated: June 3, 2014 00:59 IST2014-06-03T00:59:27+5:302014-06-03T00:59:27+5:30

अकोला : ठरावीक कालावधीतच ग्राहकांजवळून नियमित वीज देयक वसूल करणार्‍या महावितरण कंपनीचे स्थानिक अधिकारी सुस्तावल्याचे चित्र आहे. ऐन उन्हाळ्यात रविवारी मध्यरात्री व पहाटेपर्यंत शहराच्या विविध भागात विजेचा लपंडाव सुरू होता. मध्यरात्री १२ वाजतापासून ते सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत महावितरण कंपनीने अकोलेकरांना अक्षरश: घामाघूम केले. या प्रकारामुळे अकोलेकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

Lightning scared in city; Power company lethargic | शहरात विजेचा लपंडाव नागरिक त्रस्त; वीज कंपनीचे अधिकारी सुस्त

शहरात विजेचा लपंडाव नागरिक त्रस्त; वीज कंपनीचे अधिकारी सुस्त

ोला : ठरावीक कालावधीतच ग्राहकांजवळून नियमित वीज देयक वसूल करणार्‍या महावितरण कंपनीचे स्थानिक अधिकारी सुस्तावल्याचे चित्र आहे. ऐन उन्हाळ्यात रविवारी मध्यरात्री व पहाटेपर्यंत शहराच्या विविध भागात विजेचा लपंडाव सुरू होता. मध्यरात्री १२ वाजतापासून ते सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत महावितरण कंपनीने अकोलेकरांना अक्षरश: घामाघूम केले. या प्रकारामुळे अकोलेकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा सर्वाधिक धसका वीज कंपनीने घेतल्याचे दिसते. शहराच्या पूर्व भागात सुसाट्याचा वारा सुटताच, चक्क पि›म भागातील वीज पुरवठा खंडित केला जात असल्याचा अजब प्रकार वारंवार समोर येत आहे. रविवारी मध्यरात्रीपासून ते सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत वीज कंपनीने अक ोलेकरांसोबत चांगलाच खेळ केला. शहरात सायंकाळी कोण्याही भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करण्यासाठी वीज कंपनीकडे कोणतीही सक्षम यंत्रणा कार्यरत नसल्याचे दिसून येते. उंच शिडी नसल्याने कंपनीचे कर्मचारी काम करण्यास टाळाटाळ करतात. वादळी वारा व मुसळधार पावसाच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप होत आहे. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अकोलेकरांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून, त्याचा कोणत्याही क्षणी उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Lightning scared in city; Power company lethargic