LIC Policy : भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने आपल्या पॉलिसीधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. बंद पडलेल्या वैयक्तिक विमा पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी एलआयसीने एक विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमुळे ज्या ग्राहकांनी काही कारणांमुळे आपल्या पॉलिसीचे प्रीमियम वेळेवर भरले नाहीत, त्यांना दिलासा मिळणार आहे.
मोहिमेची मुदत आणि सवलत
ही विशेष मोहीम सोमवार, १८ ऑगस्ट रोजी सुरू झाली असून ती पुढील एक महिन्यासाठी म्हणजेच १७ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालेल. या मोहिमेअंतर्गत, पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या विलंब शुल्कात आकर्षक सवलती दिल्या जात आहेत.
नॉन-लिंक्ड पॉलिसी (Term Insurance) : या प्रकारच्या पॉलिसींसाठी विलंब शुल्कावर ३० टक्के सूट दिली जात आहे. ही सूट जास्तीत जास्त ५,००० रुपयांपर्यंत असेल.
सूक्ष्म विमा पॉलिसी : कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी असलेल्या या पॉलिसींसाठी विलंब शुल्कात १०० टक्के सूट दिली जाईल.
LIC offers an excellent opportunity for revival of lapsed policy.#LIC#LapsedPolicypic.twitter.com/UQFj2lNtSr
— LIC India Forever (@LICIndiaForever) August 18, 2025
पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठीचे नियम
- या मोहिमेत सहभागी होण्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत.
- ज्या पॉलिसींचा प्रीमियम भरण्याची मुदत संपली आहे, अशा पॉलिसी पुन्हा सुरू करता येतील.
- प्रीमियम भरण्याची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतरही, पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून ५ वर्षांच्या आत पॉलिसी सुरू करता येईल.
- ज्या पॉलिसींची मुदत पूर्ण झालेली नाही, त्या पॉलिसी या मोहिमेचा लाभ घेऊ शकतात.
- कंपनीने स्पष्ट केले आहे की, पॉलिसी पुन्हा सुरू करताना लागणाऱ्या कोणत्याही वैद्यकीय किंवा आरोग्य तपासणीच्या अटींमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही.
वाचा - आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
ही मोहीम अशा पॉलिसीधारकांसाठी खूप फायदेशीर आहे, जे काही कारणास्तव वेळेवर प्रीमियम भरू शकले नाहीत. एलआयसीने निवेदनात म्हटले आहे की, 'जुनी पॉलिसी पुन्हा सुरू करून विमा संरक्षण मिळवणे हे नेहमीच योग्य ठरते.' या संधीचा फायदा घेऊन अनेक ग्राहक त्यांचे विमा संरक्षण पुन्हा सुरू करू शकतात.