LG India MD Hindi Speech: एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या शेअर्सनी ५०% पेक्षा अधिक प्रीमियमवर एंट्री केल्यामुळे IPO गुंतवणूकदार खूप खूश झाले. इतक्या मोठ्या IPO ची इतकी दमदार एंट्री दीर्घकाळानंतर झाली आहे. मात्र, केवळ इतकेच नाही, तर एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे एमडी हॉन्ग जु जियोन (Hong Ju Jeon) यांच्या भाषणावरही गुंतवणूकदार प्रभावित झाले. याचं कारण असं की, त्यांनी लिस्टिंग सेरेमनीमध्ये संपूर्ण भाषण हिंदीमध्ये केलं.
त्यांनी केवळ 'नमस्ते' म्हणून काम चालवलं नाही. हॉन्ग जु जियोन यांना जानेवारी २०२३ मध्ये कंपनीचे एमडी बनवण्यात आलं होतं आणि लिस्टिंग सेरेमनीमध्ये त्यांनी इंग्रजी किंवा कोरियन भाषेऐवजी हिंदीची निवड केल्यानं गुंतवणूकदारांचं मन जिंकलं आणि त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. काही सोशल मीडिया युजर्स तर असेही म्हणू लागले की, भारतीय कंपन्यांच्या लीडर्सनीही यांच्याकडून काहीतरी शिकावं.
LG Electronics India च्या एमडींनी काय म्हटलं?
"नमस्ते। मान्यवर, विशेष रूपाने, एनएसईचे सीईओ श्री आशिष चौहान. या ऐतिहासिक संधीमध्ये एलजी इलेक्ट्रॉनिक्ससोबत सामील झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। हा आयपीओ एलजीसाठी केवळ एक आर्थिक उपलब्धी नाही, तर ही एका नवीन भविष्याची सुरुवात आहे, जे आम्ही भारतातील लोकांसोबत मिळून आणखी पुढे नेऊ.आम्ही त्या तर्कांना मूल्य प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहोत, ज्यांनी आमच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवला. शेवटी मी भारत सरकार, सेबी, एनएसई, आमचे भागीदार , एलजी कुटुंब आणि ग्राहकांचे मनःपूर्वक धन्यवाद करतो। धन्यवाद। नमस्ते," असं हॉन्ग जु जियोन आपल्या भाषणादरम्यान म्हणाले.
हर्ष गोएंकांनी शेअर केला व्हिडीओ
प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, "एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्सची लिस्टिंग इश्यू प्राइसपेक्षा ५०% जास्त झाली. पण खरा प्रीमियम तर ते हिंदीमध्ये बोललेले नमस्ते हाच होता. इतकंच नव्हे, तर त्यांनी संपूर्ण भाषण हिंदीमध्ये केलं. वेल डन एलजी इंडियाचे एमडी, हॉन्ग जु जियोन!" अशी पोस्ट गोएंका यांनी केलीये.
LG Electronics lists 50% above issue price, but the real premium was the emotion in that “Namaste”🙏 and his address to investors in Hindi. Well done LG India MD, Hong Ju Jeon! pic.twitter.com/Qh5NryfZyM
— Harsh Goenka (@hvgoenka) October 14, 2025
काय आहे जियोन यांची भारतातील स्ट्रॅटेजी?
एलजीच्या भारतीय व्यवसायाची कमान सांभाळण्यापूर्वी जियोन हे आखाती देशांचा व्यवसाय सांभाळत होते. इराक, जॉर्डन, लेबनॉन आणि सीरियामध्ये कंपनीच्या उपकंपनीमध्ये ते वरिष्ठ भूमिकांमध्ये होते. जेव्हा त्यांच्याकडे भारतीय व्यवसायाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, भारत ही एक वाढत असलेली अर्थव्यवस्था आहे आणि मोठ्या लोकसंख्येमुळे ही एक आकर्षक बाजारपेठ आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादनं सादर करून आपला ग्राहकवर्ग अधिक मजबूत करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे, असं ते म्हणाले होते.