Lenskart IPO GMP: लेन्सकार्टचा आयपीओ पुढील आठवड्यात लिस्ट होणार आहे. जेव्हा या आयपीओचा प्राईस बँड घोषित झाला, तेव्हाच त्याने ग्रे मार्केटमध्ये मोठी खळबळ उडवली होती. पण आता या आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम धडाम झाला आहे, यात मोठी घसरण झाली आहे. तसेच, अलीकडेच लिस्ट झालेल्या आयपीओंच कामगिरीही चांगली राहिलेली नाही. त्यामुळे लेन्सकार्टच्या चांगल्या लिस्टिंगबद्दल गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.
लेन्सकार्ट आयपीओचा प्राईस बँड २७ ऑक्टोबर रोजी घोषित करण्यात आला होता. त्याचा प्राईस बँड ३८२ ते ४०२ रुपये प्रति शेअर दरम्यान निश्चित करण्यात आला होता. त्याच दिवशी त्याचा जीएमपी १०८ रुपये झाला होता. त्यानुसार, या आयपीओची २६.८७% प्रीमियमसह ५१० रुपयांवर लिस्ट होण्याची अपेक्षा होती. परंतु, नंतर त्याच्या जीएमपीमध्ये चढ-उतार होत राहिला आणि आता तो एकदम खाली आला आहे.
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
जीएमपी किती खाली आला?
२७ ऑक्टोबरनंतर लेन्सकार्टच्या जीएमपीमध्ये चढ-उतार दिसून आला. ३१ ऑक्टोबरला हा आयपीओ उघडला होता. त्या दिवशी त्यात थोडी वाढ झाली होती. पण त्यानंतर बोली लावण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजेच ४ नोव्हेंबरपर्यंत, त्यात सतत घसरण होत राहिली. ४ नोव्हेंबरला त्याचा जीएमपी घसरून ३९ रुपये राहिला होता. त्यानंतर यात आणखी घसरण झाली. शुक्रवार सकाळी ११:३० वाजता याचा जीएमपी घसरून १० रुपये इतका कमी झाला होता. याचा अर्थ, लेन्सकार्टच्या जीएमपीमध्ये आतापर्यंत ९० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. याचा अर्थ ४०२ रुपये इश्यू प्राईसवर केवळ २.४९% प्रीमियम मिळण्याची अपेक्षा आहे.
जीएमपीमध्ये घसरण का झाली?
जीएमपीमधील ही मोठी घसरण दर्शवते की अनौपचारिक बाजारातील व्यापारी लिस्टिंगपूर्वी सावध झाले आहेत. विश्लेषकांचं म्हणणं आहे की, लिस्टिंगच्या उत्साहात झालेली ही घट, कंपनीचं मूल्यांकन आणि शेअर बाजारातील सध्याची स्थिती यांसारख्या चिंतांमुळे झाली आहे.
आयपीओला जबरदस्त सबस्क्रिप्शन
मूल्यांकनाची चिंता असतानाही, या आयपीओला जबरदस्त सबस्क्रिप्शन मिळालं. या इश्यूचा आकार ७,२७८ कोटी रुपये होता आणि हा सन २०२५ च्या सर्वात मोठ्या ग्राहक आयपीओपैकी एक आहे. याला १ लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीची बिड्स मिळाली, म्हणजेच हा आयपीओ २८.३ पट सबस्क्राइब झाला.
संस्थात्मक गुंतवणूकदारांनी यात सर्वाधिक रस दाखवला. क्यूआयबीचा (क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्स) हिस्सा ४५ पट सबस्क्राइब झाला, जे विदेशी आणि देशांतर्गत फंडांचा मजबूत विश्वास दर्शवतो. बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १८ पट सबस्क्रिप्शन दिले, तर किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग सुमारे ७.५ पट राहिला.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
