Lokmat Money > बिझनेस न्यूज > किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता ३ लाखांवरून थेट ५ लाखांपर्यंत वाढणार? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता ३ लाखांवरून थेट ५ लाखांपर्यंत वाढणार? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Kisan Credit Card Limit : मोदी सरकार पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:27 IST2025-05-28T14:44:38+5:302025-05-28T15:27:42+5:30

Kisan Credit Card Limit : मोदी सरकार पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येऊ शकते.

kisan credit card kcc limit can be raised to 5 lakh rupees know benefits of this govt scheme | किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता ३ लाखांवरून थेट ५ लाखांपर्यंत वाढणार? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता ३ लाखांवरून थेट ५ लाखांपर्यंत वाढणार? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Kisan Credit Card Limit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (आज) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत मोदी सरकार पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना एक मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. या अंतर्गत, शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या किसान क्रेडिट कार्डची (KCC) मर्यादा आता ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?
सरकारकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी अनेक योजना राबवल्या जातात, ज्यात किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरली आहे. शेतीसाठी पैशांची गरज भासल्यास शेतकरी या कार्डचा वापर करू शकतात. या कार्डवर, शेतकऱ्यांना अत्यंत स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. विशेष म्हणजे, पशुपालक आणि मच्छीमार देखील किसान क्रेडिट कार्डचे फायदे घेऊ शकतात.

फक्त ४% व्याजदराने कर्ज!
किसान क्रेडिट कार्ड योजना १९९८ मध्ये भारत सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि नाबार्ड (NABARD) यांनी सुरू केली होती. या कार्डद्वारे शेतकऱ्यांना केवळ ४ टक्के वार्षिक व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होते. आता ही मर्यादा वाढल्यास, शेतकऱ्यांना ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज याच सवलतीच्या व्याजदराने मिळू शकते, ज्यामुळे त्यांना अधिक भांडवल उपलब्ध होईल.

किसान क्रेडिट कार्डचे नियम आणि अर्ज प्रक्रिया
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत सुरक्षित आणि असुरक्षित असे दोन प्रकारचे कर्ज दिले जाते. सुरक्षित कर्ज घेण्यासाठी जमिनीसारखी मालमत्ता गहाण ठेवावी लागते, तर असुरक्षित कर्जात काहीही गहाण ठेवण्याची गरज नसते.
आवश्यक कागदपत्रे: केसीसीसाठी पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे लागतात.

ऑनलाइन अर्ज कसा कराल
आपल्या पसंतीच्या बँकेच्या वेबसाइटला भेट द्या.
होम पेजवर 'किसान क्रेडिट कार्ड' पर्याय शोधा.
'अप्लाय' (Apply) पर्यायावर क्लिक करा.
सर्व माहिती भरा आणि 'सबमिट' करा.
तुम्हाला अर्जाचा संदर्भ क्रमांक मिळेल आणि जर तुम्ही पात्र असाल तर बँक ५ दिवसांच्या आत तुमच्याशी संपर्क साधेल.

वाचा - आता घरबसल्या होईल मालमत्ता नोंदणी! ११७ वर्षांचा जुना कायदा होणार रद्द, काय असणार नवीन नियम?

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यानंतर १५ दिवसांच्या आत जर तुम्हाला कार्ड मिळाले नाही, तर तुम्ही बँकिंग लोकपालाशी संपर्क साधू शकता. तसेच, तुम्ही आरबीआयच्या अधिकृत वेबसाइट https://cms.rbi.org.in/](https://cms.rbi.org.in/ वर तक्रार करू शकता. याशिवाय, शेतकरी किसान क्रेडिट कार्ड हेल्पलाइन क्रमांक ०१२०-६०२५१०९ / १५५२६१ आणि ईमेल pmkisan-ict@gov.in द्वारे देखील मदत डेस्कशी संपर्क साधू शकतात.

Web Title: kisan credit card kcc limit can be raised to 5 lakh rupees know benefits of this govt scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.