Jio 5G Unlimited Data Plans : २०१६ मध्ये जिओने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर बाजाराचं चित्रच बदलून गेलं आहे. जिओच्या ऑफरसमोर अनेक कंपन्यांनी आपला गाशा कायमचा गुंडाळला. आता पुन्हा एकदा रिलायन्स जिओइंटरनेटच्या दुनियेत खळबळ माजवली आहे. कंपनीने 5G युजर्ससाठी दोन नवे स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च केले आहेत. १९८ रुपये आणि ३४९ रुपये. या प्लॅन्समध्ये २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळत आहे.
१९८ रुपयांचा प्लॅन : सर्वात स्वस्त 5G प्लॅन
हा जिओचा सर्वात स्वस्त 5G प्लॅन आहे. कमी वैधता पण जबरदस्त फायदे यात मिळतात.
- डेटा: दररोज २GB डेटा + अनलिमिटेड 5G डेटा.
- कॉलिंग आणि SMS: अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० SMS.
- वैधता : फक्त १४ दिवसांची.
- अतिरिक्त फायदे: JioTV, JioCloud आणि JioCinema चे सबस्क्रिप्शन.
३४९ रुपयांचा प्लॅन : महिनाभराचा डेटा आणि अधिक फायदे
हा प्लॅन संपूर्ण महिन्याभरासाठी (२८ दिवस) वैध आहे आणि यात अनेक अतिरिक्त ऑफर्स समाविष्ट आहेत.
- डेटा: दररोज २GB डेटा + अनलिमिटेड 5G डेटा.
- कॉलिंग आणि SMS: अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० SMS.
- वैधता: २८ दिवसांची.
- अतिरिक्त ऑफर्स (सणासुदीच्या निमित्ताने): JioHome वर दोन महिन्यांची मोफत सेवा, Hotstar चे तीन महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन आणि Jio AI Cloud मध्ये ५०GB फ्री स्टोरेज.
दोन्ही प्लॅन्समध्ये कोणता स्वस्त?
जर तुम्ही १९८ रुपयांचा प्लॅन महिन्यातून दोनदा रिचार्ज केला, तर तुमचा खर्च ३९६ रुपये होईल. या तुलनेत ३४९ रुपयांचा प्लॅन एकदा रिचार्ज केल्यास संपूर्ण महिनाभर चालेल. म्हणजेच, ३४९ रुपयांचा प्लॅन थोडा स्वस्त आणि अधिक सोयीस्कर आहे.
८४ दिवसांच्या वैधतेचे 'महागडे' प्लॅन्स (OTT सह)
जिओने ८४ दिवसांची वैधता असलेले काही महागडे प्लॅन्स देखील लॉन्च केले आहेत, जे ओटीटी आणि एंटरटेनमेंट लव्हर्ससाठी उत्तम आहेत.
| प्लॅन (₹) | वैधता (दिवस) | मुख्य फायदे | OTT सबस्क्रिप्शन |
| १०२९ रुपये | ८४ | दररोज २GB डेटा, अनलिमिटेड 5G | Amazon Prime Lite, Jio Hotstar (३ महिने), JioHome (२ महिने फ्री ट्रायल), Jio AI Cloud (५०GB) |
| १०४९ रुपये | ८४ | दररोज २GB डेटा, अनलिमिटेड 5G | SonyLiv, Zee5, JioHotstar, JioTV (JioHome चा २ महिन्यांचा फ्री ट्रायल) |
| १२९९ रुपये | ८४ | दररोज २GB डेटा, अनलिमिटेड 5G | Netflix, JioHotstar, JioTV (JioHome चा फ्री ट्रायल) |
वाचा - इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
रिचार्ज कसा कराल?
तुम्ही MyJio ॲप किंवा जिओच्या वेबसाइटवर प्रीपेड सेक्शनमध्ये जाऊन हे प्लॅन्स निवडू शकता. 'Buy Now' वर क्लिक करून मोबाइल नंबर टाकल्यानंतर Google Pay, Paytm किंवा PhonePe सारख्या ॲप्समधून पेमेंट करता येते.
