Multibagger Stock: स्मॉलकॅप कंपनी जिंदाल फोटोच्या शेअर्समध्ये बाजारात घसरण असतानाही मोठी तेजी दिसून आली आहे. गुरुवारी BSE मध्ये इंट्राडे दरम्यान जिंदाल फोटोचे शेअर्स १३ टक्क्यांहून अधिक वाढीसह १४९० रुपयांवर पोहोचले. कंपनीचे शेअर्स आपल्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीच्या जवळ पोहोचले आहेत. गेल्या ६ महिन्यांत जिंदाल फोटोच्या शेअर्समध्ये ७० टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. तसंच, गेल्या पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सनी ५७०० टक्क्यांहून अधिक उसळी घेतली.
५७००% पेक्षा जास्त वाढले कंपनीचे शेअर्स
स्मॉलकॅप कंपनी जिंदाल फोटोचे (Jindal Photo) शेअर्स गेल्या पाच वर्षांत ५७०० टक्क्यांहून अधिक वाढलेत. या मल्टिबॅगर कंपनीचे शेअर्स ८ जानेवारी २०२१ रोजी २५.३५ रुपयांवर होते. जिंदाल फोटोचे शेअर्स ८ जानेवारी २०२६ रोजी BSE मध्ये १४९० रुपयांवर पोहोचले. गेल्या ४ वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये ४६५ टक्क्यांहून अधिक तेजी आली. तीन वर्षांत कंपनीचे शेअर्स ३५० टक्क्यांनी वधारले आहेत. तसेच, गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ८० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या मल्टिबॅगर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी १६३४.८० रुपये आहे.
५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून १८०% उसळी
जिंदाल फोटोचे (Jindal Photo) चे शेअर्स आपल्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून सुमारे १८० टक्क्यांनी वधारलेत. जिंदाल फोटोच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ५३२.३० रुपये आहे. ४ मार्च २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स या पातळीवर होते. ८ जानेवारी २०२६ रोजी कंपनीचे शेअर्स १४९० रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा ७४.२० टक्के आहे, तर सार्वजनिक भागधारकांचा हिस्सा २५.८० टक्के आहे. गुरुवार, ८ जानेवारी रोजी जिंदाल फोटोचे मार्केट कॅप १५०० कोटी रुपयांच्या पुढे गेलं.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
