Jet Fuel Prices: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एप्रिल महिन्यासाठी एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) अर्थात विमान इंधनाच्या नव्या दरांची घोषणा केली असून, त्यात तब्बल ११५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. भारतीय विमान वाहतूक क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच जेट इंधनाचा दर प्रति किलोलीटर ₹२ लाखांच्या पुढे गेला आहे.
Jet fuel (ATF) prices more than doubled to record Rs 2.07 lakh/kl driven by surge in global oil prices linked to ongoing West Asia conflict. pic.twitter.com/Dwn381dawb
— Press Trust of India (@PTI_News) April 1, 2026
दिल्ली व मुंबईत इंधन दरात मोठी वाढ
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGIA) घरगुती उड्डाणांसाठी ATF चा दर मागील महिन्यातील ₹९६,६३८.१४ प्रति किलोलीटरवरून वाढून ₹२,०७,३४१.२२ प्रति किलोलीटर झाला आहे. ही वाढ सुमारे ११४.५ टक्के आहे. तर, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) ATF चे दर ११५ टक्क्यांनी वाढून ₹१,९४,९६८.६७ प्रति किलोलीटरपर्यंत पोहोचले आहेत. चेन्नई आणि कोलकाता येथेही विमान इंधनाचे दर ₹२ लाख प्रति किलोलीटरच्या पुढे गेले आहेत.
आंतरराष्ट्रीय उड्डाणेही महागणार
भारतीय विमान कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी लागणाऱ्या इंधनाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. दिल्लीहून आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी इंधनाचा दर आता $१,६९० प्रति किलोलीटर झाला असून, ही वाढ सुमारे १०७ टक्के आहे. कोलकात्यात हा दर सर्वाधिक $१,७२७ प्रति किलोलीटरपर्यंत पोहोचला आहे.
ATF prices in India were deregulated in 2001 and are revised on monthly basis based on a formula of international benchmarks. Due to the closure of Strait of Hormuz and extraordinary situation in global energy markets, price of ATF for domestic markets was expected to increase by…
— Ministry of Petroleum and Natural Gas #MoPNG (@PetroleumMin) April 1, 2026
विमान कंपन्यांसमोर अस्तित्वाचा प्रश्न
जेट इंधनाचा खर्च आधीच विमान कंपन्यांच्या एकूण ऑपरेटिंग खर्चाच्या ४० ते ४५ टक्के होता. आता इंधन दरात झालेल्या मोठ्या वाढीनंतर लहान विमान कंपन्यांसाठी उड्डाणे सुरू ठेवणे कठीण होऊ शकते. युद्धामुळे युरोप आणि अमेरिकेकडे जाणाऱ्या उड्डाणांना लांब मार्गाने जावे लागत असल्याने इंधनाचा वापरही वाढला आहे. वाढत्या खर्चामुळे आणि संभाव्य कमी होणाऱ्या मागणीमुळे विमान कंपन्यांना उड्डाणांची संख्या कमी करावी लागू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रवाशांवर वाढीव खर्चाचा भार
विमान कंपन्या वाढलेल्या इंधन खर्चाचा भार आता प्रवाशांवर टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमान तिकीटांचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. २१ मार्च २०२६ रोजी सरकारने घरगुती उड्डाणांवरील ₹१८,००० ची भाडे मर्यादा (फेअर कॅप) हटवली आहे, त्यामुळे आता तिकीट दर वाढण्यास मोकळीक मिळाली आहे. इंडिगो, एअर इंडिया आणि आकासा यांसारख्या विमान कंपन्यांनी आधीच फ्यूल सरचार्ज लागू केला असून, तो पुढील काळात आणखी वाढवला जाऊ शकतो.
