lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹२ च्या शेअरनं १ लाखांचे केले ₹९ कोटी; १३९० EV बसची ऑर्डर, एक्सपर्ट म्हणाले, "₹२००० च्या वर..."

₹२ च्या शेअरनं १ लाखांचे केले ₹९ कोटी; १३९० EV बसची ऑर्डर, एक्सपर्ट म्हणाले, "₹२००० च्या वर..."

JBM Auto Limited Share: कंपनीचे ​​शेअर्स २०२४ मध्ये आतापर्यंत १७ टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचे शेअर आज गुरुवारी ट्रेडिंग दरम्यान २.१७ टक्क्यांनी वाढून १,८९७.५५ रुपयांवर पोहोचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 12:41 PM2024-03-22T12:41:39+5:302024-03-22T12:42:18+5:30

JBM Auto Limited Share: कंपनीचे ​​शेअर्स २०२४ मध्ये आतापर्यंत १७ टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचे शेअर आज गुरुवारी ट्रेडिंग दरम्यान २.१७ टक्क्यांनी वाढून १,८९७.५५ रुपयांवर पोहोचला.

JBM Auto Limited share of rs 2 made 1 lakh to rs 9 crore 1390 EV bus orders experts says it will go above 2000 | ₹२ च्या शेअरनं १ लाखांचे केले ₹९ कोटी; १३९० EV बसची ऑर्डर, एक्सपर्ट म्हणाले, "₹२००० च्या वर..."

₹२ च्या शेअरनं १ लाखांचे केले ₹९ कोटी; १३९० EV बसची ऑर्डर, एक्सपर्ट म्हणाले, "₹२००० च्या वर..."

JBM Auto Limited Share:  जेबीएम ऑटो लिमिटेडचे ​​शेअर्स 2024 या वर्षात आतापर्यंत 17 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचा शेअर आज गुरुवारी ट्रेडिंग दरम्यान 2.17 टक्क्यांनी वाढून 1,897.55 रुपयांवर पोहोचला. गेल्या एका वर्षात हा शेअर सुमारे 206 टक्क्यांनी वाढलाय. तर हा स्टॉक पाच वर्षांत 1,664.82% वाढला. या शेअरनं दीर्घ मुदतीत मोठा परतावा दिला आहे. 27 मार्च 2009 रोजी या शेअरची किंमत 2 रुपये होती. त्यानुसार या शेअरने आतापर्यंत 95000 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. म्हणजेच या कालावधीदरम्यान 1 लाख रुपयांच्या गुंतवणूकीचं मूल्य आता 9 कोटींहून अधिक झालं आहे.
 

1,390 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर
 

कंपनीने अलीकडेच, तिची उपकंपनी जेबीएम इकोलाइफ मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडला पीएम-ईबस सेवा योजनेअंतर्गत 1,390 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाली असल्याची माहिती दिली. या ऑर्डरची किंमत अंदाजे 7,500 कोटी रुपये आहे.
 

काय आहे ब्रोकरेजचं मत?
 

कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसू शकते असं मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केलंय. 2050 रुपयांच्या टार्गेट प्राईजसाठी हे शेअर खरेदी करता येऊ  शकतात, असं रेलिगेअर ब्रोकिंगनं म्हटलंय. स्टॉप लॉस 1850 रुपयांवर ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय. जेबीएम ऑटो जेबीएम समूहाचा एक भाग आहे. समूहाचं 10 देशांमद्ये 25 पेक्षा अधिक ठिकाणी कामकाज चालतं. ऑटो सिस्टम, इलेक्ट्रिक वाहन आणि बस यांच्या जगातील प्रमुख उत्पादकांपैकी हे एक आहेत.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: JBM Auto Limited share of rs 2 made 1 lakh to rs 9 crore 1390 EV bus orders experts says it will go above 2000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.