lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ITR Filing Last Date: 15 मिनिटांच्या वैधतेचा ओटीपी तासाने आला; करदाते आयकर विभागाची उडवू लागले खिल्ली

ITR Filing Last Date: 15 मिनिटांच्या वैधतेचा ओटीपी तासाने आला; करदाते आयकर विभागाची उडवू लागले खिल्ली

ITR Filing Last Date extend memes: काही लोकांना तर आयकर विभागाच्या पोर्टलवर रजिस्टर होण्यास समस्या येत आहे. एकाने तर निर्मला सीतारामन कसा विचार करतात तेच सांगितले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 08:13 PM2021-12-27T20:13:36+5:302021-12-27T20:14:22+5:30

ITR Filing Last Date extend memes: काही लोकांना तर आयकर विभागाच्या पोर्टलवर रजिस्टर होण्यास समस्या येत आहे. एकाने तर निर्मला सीतारामन कसा विचार करतात तेच सांगितले आहे.

ITR Filing Last Date: OTP of 15 minutes validity arrived after an hour; Taxpayers started mocking the income tax department | ITR Filing Last Date: 15 मिनिटांच्या वैधतेचा ओटीपी तासाने आला; करदाते आयकर विभागाची उडवू लागले खिल्ली

ITR Filing Last Date: 15 मिनिटांच्या वैधतेचा ओटीपी तासाने आला; करदाते आयकर विभागाची उडवू लागले खिल्ली

ITR Filing Last Date: जसजशी इन्कम टॅक्स भरण्याची शेवटचीतारीख जवळ येत आहे, तसतशी लोकांकडून ही मुदत वाढविण्याची मागणी केली जात आहे. ट्विटरवर देखील लोक मोठ्या प्रमाणावर मागणी करत आहेत. एवढी की Extent_due_date_immediately हा टॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. काही लोकांनी आयकर विभागाच्या नव्या वेबसाईटची खिल्ली उडविली आहे, तर काहींनी गंभीरतेने मागणी केली आहे. 

एका युजरने आयकर विभागाच्या वेबसाईटवर एरर येत असल्याचे म्हटले आहे. जेव्हा तो आयटीआर २ फॉर्म भरत होता, तेव्हा एरर आला आणि सारा डेटा गायब झाल्याचे तो म्हणाला. 

एका दुसऱ्या व्यक्तीने म्हटले की, हे डिजिटल इंडिया काय आहे? 15 मिनिटांच्या वैधतेचा ओटीपी 1 तासाने आला, समजत नाहीय की कोणाला दोष देऊ, टेलिकॉम ऑपरेटर की आयकर विभागाच्या नव्या पोर्टलला. 

काही लोकांना तर आयकर विभागाच्या पोर्टलवर रजिस्टर होण्यास समस्या येत आहे. एकाने तर निर्मला सीतारामन कसा विचार करतात तेच सांगितले आहे. शेवटच्या दिवशीपर्यंत मुदत वाढविणार नाही, लोकांनी धावाधाव करावी आणि कर भरावा. मग हे मुदत वाढविणार आणि करदात्यांना दिलासा दिल्याची घोषणा करत फिरणार, असे त्याने म्हटले आहे.

 

एका युजरने तर आयकर विभागाची वेबसाईट बनविणाऱ्या इन्फोसिसलाच टार्गेट केले आहे. आतापर्यंत इन्फोसिसने देखील आपला GSTR 9C भरला नाहीय, म्हणजे त्यांनाच त्यांनी बनविलेल्या पोर्टलवर योग्य प्रकारे आयटीआर फाईल होणार की नाही त्यावर विश्वास नाहीय असे दिसते, असे तो म्हणाला. यासाठी त्याने काही स्क्रीनशॉट दिले आहेत. 

Web Title: ITR Filing Last Date: OTP of 15 minutes validity arrived after an hour; Taxpayers started mocking the income tax department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.