lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Accenture कंपनीनं तयार केली कर्मचारी कपातीची सर्वात मोठी लिस्ट, १९००० लोकांची नोकरी जाणार; कारणही सांगितलं!

Accenture कंपनीनं तयार केली कर्मचारी कपातीची सर्वात मोठी लिस्ट, १९००० लोकांची नोकरी जाणार; कारणही सांगितलं!

जगावर मंदीचं संकट वाढत असून दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा सपाटा लावला आहे. आता यामध्ये आणखी एका कंपनीचं नाव सामील झालं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 07:36 PM2023-03-23T19:36:59+5:302023-03-23T19:38:44+5:30

जगावर मंदीचं संकट वाढत असून दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा सपाटा लावला आहे. आता यामध्ये आणखी एका कंपनीचं नाव सामील झालं आहे.

it major accenture to lay off 19000 employees in 18 months amid recession fear details | Accenture कंपनीनं तयार केली कर्मचारी कपातीची सर्वात मोठी लिस्ट, १९००० लोकांची नोकरी जाणार; कारणही सांगितलं!

Accenture कंपनीनं तयार केली कर्मचारी कपातीची सर्वात मोठी लिस्ट, १९००० लोकांची नोकरी जाणार; कारणही सांगितलं!

नवी दिल्ली-

जगावर मंदीचं संकट वाढत असून दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा सपाटा लावला आहे. आता यामध्ये आणखी एका कंपनीचं नाव सामील झालं आहे. आयटी सेक्टरमधील मोठी कंपनी असलेल्या एक्स्चेंरनं (Accenture) गुरुवारी आपल्या एकूण कर्मचारी संख्येपैकी तब्बल १९००० लोकांची यादी तयारी केली आहे. या सर्वांना नोकरीवरुन कमी केलं जाणार आहे. तसंच कंपनीनं आपल्या अंदाजित वार्षिक कमाई आणि नफ्याचं लक्ष्य देखील कमी केलं आहे.

२.५ टक्के कर्मचारी कपातीचा निर्णय
एक्स्चेंर कंपनीनं येत्या दिवसात कामावरुन कमी केलं जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत २.५ टक्के इतकं असणार आहे असं जाहीर केलं आहे. कंपनीकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार कंपनीतील नोकरकपात टप्प्याटप्प्यानं केली जाणार आहे. ही पुढील दीड वर्षात पूर्ण होईल. 

कारणंही सांगितलं
कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार बड्या कंपनीशी निगडीत वित्तीय वर्ष २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत आपला खर्च कमी करण्यासाठी आणि आपली वाढ रुळावर आणण्यासाठी काही कठोर पावलं उचलली जात आहेत. याच अंतर्गत कर्मचारी कपात केली जात आहे. याआधी अॅमेझॉननं १८ हजार कर्मचारी, मायक्रोसॉफ्ट ११ हजार तर फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटानं दोन टप्प्यात २१ हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती. आता एक्स्चेंर कंपनीनं मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. 

Web Title: it major accenture to lay off 19000 employees in 18 months amid recession fear details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.