Lokmat Money > बिझनेस न्यूज > EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?

EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?

Products On EMI: आजच्या काळात अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पूर्वी जी कामं करण्यासाठी खूप मेहनत आणि वेळ लागत होता, ती कामं आजकाल काही सेकंदात केली जातात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:04 IST2025-07-10T13:00:17+5:302025-07-10T13:04:32+5:30

Products On EMI: आजच्या काळात अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पूर्वी जी कामं करण्यासाठी खूप मेहनत आणि वेळ लागत होता, ती कामं आजकाल काही सेकंदात केली जातात.

Is it right to buy things on EMI buy now pay later Many people do this these days What is the truth about EMI | EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?

EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?

Products On EMI: हल्ली काहीही विकत घेणं अवघड नाही. तुम्ही कमी पैशात ईएमआयवर काहीही सहज खरेदी करू शकता. ईएमआयमध्ये तुम्हाला व्याजासह दर महिन्याला थोडी रक्कम भरावी लागते, पण ते कितपत योग्य आहे ते जाणून घेऊया.

आजच्या काळात अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पूर्वी जी कामं करण्यासाठी खूप मेहनत आणि वेळ लागत होता, ती कामं आजकाल काही सेकंदात केली जातात. यातील एक सुविधा म्हणजे फायनान्स. आजकाल फायनान्सशी निगडीत सर्वात मोठं काम फोनद्वारे काही सेकंदात केलं जातं. जसं की कर्ज घेणं. आजकाल लोकांना बँकेकडून कर्ज घेण्याची खूप आवड झाल्यासारखं चित्र दिसून येत आहे. काही लोक घर घेण्यासाठी गृहकर्ज घेत आहेत, तर काही जण कार खरेदी साठी कार लोन घेत आहेत. इतकंच नाही तर हल्ली लोक ईएमआयवर फोन, एसी, कूलर, फ्रिज, विमानाचं तिकीटही घेत आहेत.

२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?

हल्ली काहीही विकत घेणं अवघड नाही. तुम्ही कमी पैशात ईएमआयवर काहीही सहज खरेदी करू शकता. ईएमआयमध्ये तुम्हाला व्याजासह दरमहा थोडी रक्कम भरावी लागते. जेव्हा तुम्ही ईएमआयवर एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा ती वस्तू तुम्हाला त्याच्या वास्तविक किमतीपेक्षा जास्त किंमतीत मिळते.

ईएमआय म्हणजे डेट ट्रॅप

फायनान्शियल एक्स्पर्ट तापस चक्रवर्ती यांनी आपल्या लिंक्डइनवर पोस्ट करत ईएमआयला डेट ट्रॅप म्हणून संबोधलं आहे आणि ईएमआयचा बोजा आजकाल लोकांना कर्जाच्या जाळ्यात अडकवत असल्याचं त्यांनी म्हटलं. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, भारतातील लोकांसाठी सर्वात मोठा सापळा महागाई किंवा कर नाही तर तो ईएमआय आहे. आजकाल लोकांचा ईएमआय त्यांच्यासाठी सर्वात मोठा धोका आहे.

तापस चक्रवर्ती पुढे सोप्या शब्दात ईएमआय डेट ट्रॅपचं सूत्र समजावून सांगतात. "कमवा, उधार घ्या, परतफेड करा, मग पुनरावृत्ती करा, बचत नाही, पुन्हा स्वाइप करा." लोकांचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी ईएमआयची सुविधा सुरू करण्यात आली होती, पण हा ईएमआय हळूहळू लोकांसाठी जगण्याचा मार्ग बनत चालला असल्याचं ते म्हणाले.

५ पैकी ३ जणांवर ३ पेक्षा अधिक लोन

चक्रवर्ती पुढे म्हणतात, देशांतर्गत कर्ज भारताच्या जीडीपीच्या ४२% पर्यंत पोहोचलं आहे. यातील मोठा हिस्सा क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन आणि "Buy Now, Pay Later" या पर्यायांमधून येतो. इतकेच नव्हे तर भारतात विकले जाणारे ७० टक्के आयफोन ईएमआयवर खरेदी केले जात आहेत. तर तज्ज्ञांच्या मते, दर ५ पैकी ३ लोकांवर ३ पेक्षा जास्त कर्ज आहे.

Web Title: Is it right to buy things on EMI buy now pay later Many people do this these days What is the truth about EMI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.