Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इराणचा सर्वात श्रीमंत व्यक्ती; १३ अब्ज डॉलर्सचे साम्राज्य, एका चुकीमुळे मिळाली मृत्युदंडाची शिक्षा

इराणचा सर्वात श्रीमंत व्यक्ती; १३ अब्ज डॉलर्सचे साम्राज्य, एका चुकीमुळे मिळाली मृत्युदंडाची शिक्षा

Iran Richest man: इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने एन्ट्री घेतल्यामुळे युद्ध अधिक भयानक बनले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 17:12 IST2025-06-22T17:11:37+5:302025-06-22T17:12:28+5:30

Iran Richest man: इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने एन्ट्री घेतल्यामुळे युद्ध अधिक भयानक बनले आहे.

Iran Richest man: Built a $13.5 billion empire from oil sales, received the death penalty for a mistake | इराणचा सर्वात श्रीमंत व्यक्ती; १३ अब्ज डॉलर्सचे साम्राज्य, एका चुकीमुळे मिळाली मृत्युदंडाची शिक्षा

इराणचा सर्वात श्रीमंत व्यक्ती; १३ अब्ज डॉलर्सचे साम्राज्य, एका चुकीमुळे मिळाली मृत्युदंडाची शिक्षा

Iran Richest Businessman:इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने एन्ट्री घेतल्यामुळे युद्ध अधिक भयानक बनले आहे. अमेरिकेने इराणच्या अणुतळांवर हल्ला केल्यामुळे इराण प्रचंड संतापला असून, इस्रायली शहरांवर बॉम्बफेक अधिक तीव्र केली आहे. या युद्धात दोन्ही देशांचा पाण्यासारखा पैसा खर्च होत असून, व्यवसायांवरही परिणाम होत आहेत. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला इराणमधील एका अशा व्यावसायिकाबद्दल सांगणार आहोत, ज्याला एका चुकीसाठी मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती.

इराणचा सर्वात श्रीमंत व्यवसायिक
ही गोष्ट थोडी जुनी आहे. २०१३ मध्ये इराणचा सर्वात श्रीमंत व्यापारी बाबक झंजानी याला मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यावेळी झंजानी यांची मालमत्ता सुमारे १३.५ अब्ज डॉलर्स, म्हणजेच सुमारे ९१८ अब्ज रुपये होती. ४१ वर्षीय झंजानी यांनी अल्पावधीतच मोठा व्यवसाय उभारला होता. काही वर्षांतच ते इराणचे सर्वात श्रीमंत व्यापारी बनले होते.

भ्रष्टाचारासाठी मृत्युदंड
२०१३ मध्ये राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांच्या कार्यकाळात झंजानी यांना अटक करण्यात आली होती. तेल विक्रीच्या बदल्यात त्यांच्या खात्यांमध्ये परदेशातून अब्जावधी रुपये बेकायदेशीरपणे स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्या काळात पाश्चात्य देशांनी इराणवर निर्बंध लादले होते, ज्यामुळे इराणी बँकांमध्ये परकीय चलन हस्तांतरित करणे शक्य झाले नाही. अशा परिस्थितीत झंजानी यांनी त्यांच्या खात्यात पैसे घेतले, परंतु २०१३ मध्ये नवे राष्ट्राध्यक्ष हसन रूहानी यांनी सत्ता हाती घेताच झंजानी यांना ताबडतोब अटक केली. झंजानी यांच्यावर तेल विक्रीच्या बदल्यात परदेशातून त्यांच्या खात्यांमध्ये २.८ अब्ज डॉलर्स बेकायदेशीरपणे स्वीकारल्याचा आरोप होता.

तीन वर्षे कायदेशीर लढाई, नंतर मृत्युदंड
तीन वर्षे खटला कोर्टात चालू राहिला. २०१६ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने त्यांना मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवले आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, परंतु सर्वोच्च न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. मात्र, पुढे सुदैवाने त्यांची मृत्युदंडाची शिक्षा २० वर्षांच्या तुरुंगवासात बदलण्यात आली. झंजानी अजूनही तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. 

Web Title: Iran Richest man: Built a $13.5 billion empire from oil sales, received the death penalty for a mistake