Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Iran Israel War Cyber Fraud: UAE मध्ये इराणच्या हल्ल्याचा फायदा घेत सायबर ठगांचा उच्छाद; लोकांच्या अकाऊंटमधून उडवताहेत पैसे

Iran Israel War Cyber Fraud: UAE मध्ये इराणच्या हल्ल्याचा फायदा घेत सायबर ठगांचा उच्छाद; लोकांच्या अकाऊंटमधून उडवताहेत पैसे

Iran Israel War Cyber Fraud: संयुक्त अरब अमिरातीमध्ये इराणकडून झालेल्या हल्ल्यांचा फायदा घेत सायबर ठग सक्रिय झालेत. लोकांच्या डिजिटल ओळखीशी संबंधित संवेदनशील माहिती चोरून ते बँक खात्यातून पैसे लंपास करत असल्याची माहिती समोर आलीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 08:53 IST2026-03-02T08:52:47+5:302026-03-02T08:53:34+5:30

Iran Israel War Cyber Fraud: संयुक्त अरब अमिरातीमध्ये इराणकडून झालेल्या हल्ल्यांचा फायदा घेत सायबर ठग सक्रिय झालेत. लोकांच्या डिजिटल ओळखीशी संबंधित संवेदनशील माहिती चोरून ते बँक खात्यातून पैसे लंपास करत असल्याची माहिती समोर आलीये.

Iran Israel War Cyber thugs are taking advantage of Iran s attack in the UAE They are stealing money from peoples accounts | Iran Israel War Cyber Fraud: UAE मध्ये इराणच्या हल्ल्याचा फायदा घेत सायबर ठगांचा उच्छाद; लोकांच्या अकाऊंटमधून उडवताहेत पैसे

Iran Israel War Cyber Fraud: UAE मध्ये इराणच्या हल्ल्याचा फायदा घेत सायबर ठगांचा उच्छाद; लोकांच्या अकाऊंटमधून उडवताहेत पैसे

Iran Israel War Cyber Fraud: संयुक्त अरब अमिरातीमध्येइराणकडून झालेल्या हल्ल्यांचा फायदा घेत सायबर ठग सक्रिय झालेत. लोकांच्या डिजिटल ओळखीशी संबंधित संवेदनशील माहिती चोरून ते बँक खात्यातून पैसे लंपास करत असल्याची माहिती समोर आलीये. दुबई पोलिसांनी नोटीस जारी करून यासंदर्भात इशाराही दिलाय. सायबर ठग स्वतःला 'दुबई क्राइसिस मॅनेजमेंट'शी संबंधित असल्याचं सांगून किंवा पोलिसांशी संबंधित असल्याचा दावा करून UAE Pass आणि Emirates ID ची माहिती मागत असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. अशी माहिती शेअर केल्यामुळे सिम कार्ड आणि बँकिंग फसवणुकीचा मार्ग मोकळा होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि कोणत्याही संशयास्पद कॉल किंवा मेसेजची त्वरित तक्रार करावी, असं आवाहनही अधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय.

दुबई पोलिसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

दुबई पोलिसांनी अलीकडील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इशारा दिलाय की, काही ठग 'दुबई क्राइसिस मॅनेजमेंट' नावाच्या संस्थेशी संबंधित कर्मचारी बनून लोकांना टार्गेट करत आहेत. हे ठग स्वतःला दुबई पोलिसांशी संबंधित असल्याचं सांगून डिजिटल ओळखीशी संबंधित डेटा, जसे की UAE Pass आणि अमिरात आयडी कार्डची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुबई पोलिसांनी स्पष्ट केलं की, अशा प्रकारची माहिती शेअर केल्यामुळे ठग 'सिम स्वॅप' सारखी फसवणूक करू शकतात आणि बँकिंग ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बँक खात्यांवरही नियंत्रण मिळवू शकतात.

ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं! कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका; ८ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर

९०१ नंबरवर करू शकता कॉल

पोलीस फोन कॉल किंवा मेसेजेस मार्फत कोणत्याही प्रकारची गोपनीय माहिती किंवा व्हेरिफिकेशन कोड (OTP) मागत नाहीत, असंही दुबई पोलिसांनी स्पष्ट केलंय. जनतेला आवाहन करण्यात आलंय की, त्यांनी कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा संस्थेसोबत आपली वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती शेअर करू नये.

तसंच, फसवणुकीच्या कोणत्याही प्रयत्नाची त्वरित तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलंय. यासाठी ९०१ वर कॉल केला जाऊ शकतो किंवा eCrime प्लॅटफॉर्मद्वारे इलेक्ट्रॉनिक गुन्ह्याची नोंद केली जाऊ शकते.

Web Title : यूएई: ईरानी हमले का फायदा उठाकर साइबर ठगों द्वारा खातों से पैसे उड़ाए जा रहे हैं।

Web Summary : यूएई में साइबर अपराधी ईरानी हमले का फायदा उठाकर संवेदनशील जानकारी चुरा रहे हैं और बैंक खाते खाली कर रहे हैं। दुबई पुलिस ने चेतावनी जारी की है, निवासियों से संकट प्रबंधन या पुलिस के रूप में प्रतिरूपण करने वाले घोटालों से सावधान रहने का आग्रह किया है, जो व्यक्तिगत जानकारी मांग रहे हैं। धोखाधड़ी से बचने के लिए संदिग्ध गतिविधि की तुरंत रिपोर्ट करें।

Web Title : UAE: Cybercriminals Exploit Iran Attack, Stealing Money from Accounts.

Web Summary : Cybercriminals in the UAE are exploiting the Iran attack by stealing sensitive data and emptying bank accounts. Dubai Police issued a warning, urging residents to be cautious of scams impersonating crisis management or police, seeking personal information. Report suspicious activity immediately to avoid fraud.