नवी दिल्ली - देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू होत आहे. अशातच रिझर्व्ह बँकेने लोकांना गुंतवणुकीसाठी गोल्ड बॉण्ड बाजारात आणले आहेत. लोकांमध्ये सोन्याविषयी कायमच आकर्षण राहिले आहे. परंतु, अलीकडे गुंतवणूकदार सोन्याप्रमाणेच इतरही चांगला परतावा देणाऱ्या पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. एनारॉक कंझ्युमर सेटिमेंट यांनी जारी केलेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, पाहणीसाठी निवडलेल्या लोकांपैकी ६० टक्के जणांनी रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीला पसंती दिली तर त्या तुलनेत केवळ ५ टक्के लोकांनीच सोन्याचा पर्याय निवडल्याचे दिसून आले आहे.
वयोगटानुसार गुंतवणुकीचा प्राधान्यक्रम
वय    रिअल इस्टेट    सुटी    उद्योग    इमर्जंन्सी    रिटायर्मेंट 
२५ पेक्षा कमी    १८%    ३७%    ३५%    १०%    ०%
२५-४० वर्षे    ५२%    ०६%    ३२%    ०८%    ०२%
४०-४४ वर्षे    ३५%    ०९%    १६%    १८%    २२%
५५ पेक्षा अधिक    १८%    ०५%    ०२%    ४०%    ३५%
(चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीतील आकडेवारी) 
सोन्यापेक्षा इक्विटीकडे कल अधिक
- ६६%  गुंतवणूकदारांची खर्च करण्याची क्षमता यंदा महागाई वाढल्याने कमी झाली. ३२% लोकांवर महागाईचा तितकासा परिणाम झाला नाही. मागील वर्षी महागाईमुळे ६१ टक्के लोकांना खर्च आवरता घ्यावा लागला.
- ६७% नागरिक स्वत:ला राहण्यासाठी घर किंवा फ्लॅट घेऊ इच्छितात, तर ३३% लोकांना घर किंवा अन्य मालमत्ता गुंतवणूक म्हणून किंवा भाड्यातून येणाऱ्या कमाईसाठी घ्यायचे असते. 
...तर मात्र होणार अडचण 
nसध्या देशातील व्याजदर ९.१५ टक्क्यांच्या आसपास आहेत. सध्या तरी हे दर स्थिर आहेत. त्यात मोठी वाढ वा घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत. 
n९८ लोकांनी सांगितले गृहकर्जाचे दर खूप वाढून ९.५ टक्क्यांपेक्षा अधिक झाले तर त्यांच्यासाठी घर घेणे अडचणीचे ठरू शकते.
 
